Diljit Dosanjh Delhi Concert : दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का, दिल्लीतल्या कॉन्सर्टला पोलिसांनी नाकारली परवानगी

दिलजीत दोसांजने काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'ऑरा इंडिया टूर'ची घोषणा केली होती. राजधानी दिल्लीतून या टूरला सुरूवात होणार होती. मात्र आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Diljit Dosanjh Delhi Concert : दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का, दिल्लीतल्या कॉन्सर्टला पोलिसांनी नाकारली परवानगी
| Updated on: Oct 22, 2026 | 3:56 PM

Diljit Dosanjh Delhi Concert : गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या दिल्लीत होणाऱ्या लाईव्ह कॉन्सर्टला दिल्ली पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे. दिलजीतचा हा कॉन्सर्ट 30 ऑक्टोबर, 2026 रोजी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार होता. त्यासाठी तिकीटांचं बुकिंगही सुरू झालं होतं. मात्र आता या कॉन्सर्टला परवानगी नाकारण्यात आली आहे. सुरक्षा कारणं आणि सणांचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी दिलजीतच्या या कॉन्सर्टला परवानगी दिली नाही. सध्या या प्रकरणावर दिलजीतकडून काही प्रतिक्रिया आलेली नाहीत.

विख्यात गायक असलेल्या दिलजीत दोसांझने काही दिवसांपूर्वीच आपला ‘ऑरा इंडिया टूर’ जाहीर केली होती. या टूरची सुरुवात देशाच्या राजधानी दिल्लीहून होणार होती. इंस्टाग्रामवर जारी करण्यात आलेल्या शेड्यूलनुसार दिलजीतचा दिल्लीची कॉन्सर्ट आधी 1 नोव्हेंबरला होणार होती. मात्र नंतर तारीख बदलण्यात आली आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर फक्त 30 ऑक्टोबरसाठीच तिकीट बुकिंग केलं जात होतं.

Loading...

दिलजीत दोसांजच्या ‘इंडिया ऑरा टूर’चं शेड्यूल

दिलजीत दोसांझ ने आपल्या ‘इंडिया ऑरा टूर’अंतर्गत देशातील सात शहरांत कॉन्सर्ट करण्याची घोषणा केली . याची सुरुवात दिल्लीपासून होणार होती आणि शेवट चंडीगडमध्ये होणार होता. मात्र मेकर्सनी अद्याप चंडीगड कॉन्सर्टची तारीख जाहीर केलेली नाही. तरीही 4 ऑक्टोबरच्या पोस्टमध्ये दिलजीतने उरलेल्या शहरांच्या तारखा सांगितल्या होत्या. त्यात दिल्लीतील कॉन्सर्ट पुन्हा शेड्यूल करण्यात आलं होतं, ज्याला आता पोलीस मंजुरी देण्यास नकार दिला आहे. या बातमीनं दिलजीत दोसांझच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

30 ऑक्टोबर- दिल्ली (पोलिसांची परवानगी नाही )

15 नोव्हेंबर – इंदौर, C21 एस्टेट

21 नोव्हेंबर- अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम

27 नोव्हेंबर- मुंबई, महालक्ष्मी रेस कोर्स

29 नोव्हेंबर- बंगळुरू, नाइस ग्राउंड

5 नोव्हेंबर- लखनऊ, 19th नॅशनल जंबूरी ग्राउंड

– तारखेची घोषणा नाही – चंडीगढ़, TBA

तिकीटांची किंमत किती ?

पोलिसांनी दिलजीतच्या दिल्लीतल्या ज्या कॉन्सर्टला मंजुरी देण्यास नकार दिला आहे, ती 6 तास चालणार होती. संध्याकाळी 4 वाजता या कॉन्सर्टची सुरुवात होणार होती. बुक माय शोवर या कार्यक्रमाची तिकीटांचं बुकिंग सुरू होतम. तिकीटांची सुरुवातीची किंमत 6499 रुपये ठेवलेली आहे, तर सर्वात महाग तिकीट 15,999 रुपयांचं आहे. याशिवायही अनेक इतर किमतींनाही तिकीट विक्री होत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us