Mahhi Vij : माही वीजने घटस्फोटानंतर जय कडून किती पोटगी घेतली? अभिनेत्री अखेर स्पष्टच म्हणाली…
Mahhi Vij : अभिनेत्री माही वीज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा सोशल माीडियाच्या माध्यमातून केली. आता अभिनेत्रीने पोटगीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र माही हिची चर्चा रंगली आहे.

झगमगत्या विश्वात कोणत्या लोकप्रिय सेलिब्रिटीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आणि घटस्फोट झाल्यानंतर उपस्थित होणार पहिला प्रश्न म्हणजे पोटगी किती मिळाली. सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री माही वीज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा सोशल माीडियाच्या माध्यमातून केली. सध्या माही ‘बिग बॉस 20’ मध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. यावेळी मही तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठे खुलासे करताना दिसत आहे. जय याच्यासोबत झालेल्या घटस्फोटाबद्दल सांगताना माही प्रचंड भावूक देखील झाली. यावेळी माही हिने पोटगीबद्दल मोठं वक्तव्य केलं.
घटस्फोटानंतर एकच चर्चा होती आणि ती म्हणजे, माही हिने जय याच्याकडून किती पोटगी घेतली. पण बिग बॉसच्या घरात माहीने स्वतः सांगितलं की, जय याच्याकडून 1 रुपया देखील घेतला नाही. अभिनेत्रीला स्वतःला लेक तारा हिच्यासाठी काहीतरी करुन दाखवायचं आहे… तर जाणून घ्या माही पोटगीबद्दल म्हणाली तरी काय?
‘बिग बॉस 20’ मध्ये, जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाबद्दल आणि पोटगीच्या विषयावर चर्चा करताना ती भावूक झाली. यावेळी ती ढसाढसा रडताना दिसली. अभिनेत्री म्हणाली, “न्यायालयातही लोकांनी मला पोटगी मागण्याचा सल्ला दिला होता, पण मी तसं न करण्याचा निर्णय घेतला. जयने हे पैसे स्वतःच्या कष्टाने कमावले आहेत.”
माही पुढे म्हणाली, ‘मला माझी लेक तारा हिच्यासाठी स्वतः काही तरी करायचं आहे. माझ्या मेहनतीने मला तिच्या भविष्याला आकार द्यायचा आहे. घटस्फोटाच्या वेळी जयने मला खात्री दिली होती की, जर मला कधी कशाचीही गरज पडली, तर तो मला मदत करायला नेहमी तयार असेल.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.
माही विज आणि जय भानुशाली हे तीन मुलांचे पालक
माही विज आणि जय भानुशाली यांनी 2011 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं होतं, हे दोघे सुमारे 14 वर्षे एकत्र राहिले. त्यांची मुलगी ताराचा जन्म 2019 मध्ये झाला, तर 2017 मध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेतलं होतं.
जानेवारी 2026 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. विभक्त झाल्यानंतरही दोघे मिळून आपल्या तिन्ही मुलांचं संगोपन करत आहेत. दरम्यान, जय ‘बिग बॉस 20’ मध्ये माहीला पाठिंबा देताना दिसत आहे.
