Nepotism | बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही’? पाहा काय सांगतायत दिग्दर्शक सुभाष घई…

| Updated on: Dec 08, 2020 | 7:04 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही वाद उफाळून आला आहे.

Nepotism | बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही’? पाहा काय सांगतायत दिग्दर्शक सुभाष घई...
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही वाद उफाळून आला आहे. या वादात अनेक बड्या कलाकारांची नावे पुढे आली. तर, अनेक बिग बजेट चित्रपटांना या वादाचा फटका देखील बसला. असे म्हटले जाते की, स्टार किड्सना करिअर बनवण्यास फारशी अडचण नसते, तर इतरांना अडचणी येतात. मात्र घराणेशाही वादाच्या आरोपांबाबत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई (Director Producer Subhash Ghai) यांचे मत वेगळे आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले (Director Producer Subhash Ghai Reaction on Nepotism in Bollywood).

सुभाष घई म्हणतात की, ‘गेल्या काही वर्षांत स्पर्धा वेगाने वाढली आहे आणि प्रत्येकाला चित्रपटासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत, मला वाटतं की, वंशवाद आणि घराणेशाही संपली आहे.’ ते म्हणाले की, आता या घराणेशाहीची जागा मेरिट सिस्टमने घेतली आहे. त्यामुळे प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या कुवतीनुसार भूमिका मिळत आहेत.

भारतीय चित्रपट बदलतोय…

सुभाष घई पुढे म्हणाले की, ‘भारतीय मनोरंजन उद्योग गेल्या काही वर्षांत जगातील सर्वात मोठा उद्योग म्हणून उदयास आला आहे. भारतीय चित्रपट जगात मोठा होतो आहे. आपल्याकडे खूप प्रतिभावान कलाकार उदयास येत आहेत. यामुळे स्पर्धाही अधिक मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत घराणेशाही टिकून राहणार नाही.’

सुभाष घई म्हणतात, गेल्या काही वर्षांत इंडस्ट्री वेगाने बदलली आहे. भारतीय चित्रपट देशातील प्रत्येक चांगल्या गोष्टी सादर करत आहे. चित्रपटातून आपल्या इतिहासाच्या कथा, वारसा, संस्कृती आणि पौराणिक कथा सांगितल्या जात आहेत. यातून आपल्याला प्रेम, कौटुंबिक मूल्ये, दयाळूपणा आणि धैर्य यांची शिकवण मिळते.’ (Director Producer Subhash Ghai Reaction on Nepotism in bollywood)

व्हायचे होते अभिनेता पण…

सुभाष घई स्वत: अभिनेता होण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. परंतु, अभिनेता होण्याऐवजी ते दिग्दर्शक उत्तम दिग्दर्शक झाले. त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात 1976मध्ये ‘कालीचरण’ या चित्रपटातून झाली होती. सुभाष घई या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर सुभाष घई यांनी 1989मध्ये ‘रामलखन’, 1993मध्ये ‘खलनायक’, 1997मध्ये ‘परदेस’ आणि 1999मध्ये ‘ताल’ अशा उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. परंतु, हे सर्व बदल सकारात्मक आहेत, असे घई यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बऱ्याच उत्कृष्ट कथा चित्रपटाच्या माध्यमातून सादर झाल्या आहेत. व्हिजनरी डायरेक्टर्सनी आपल्या अनोख्या स्टाईलमधून अनेक उत्तम चित्रपट बनवले आहेत.

(Director Producer Subhash Ghai Reaction on Nepotism in Bollywood)