AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | ‘पानी’ चित्रपट बनणार, सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्याचा शेखर कपूर यांचा निर्धार!

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक शेखर कपूर हे ‘पानी’ चित्रपटावर एकत्र काम करत होते.

Sushant Singh Rajput | ‘पानी’ चित्रपट बनणार, सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्याचा शेखर कपूर यांचा निर्धार!
| Updated on: Dec 08, 2020 | 4:20 PM
Share

मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर (Director Shekhar Kapur) यांनी 6 डिसेंबर रोजी लंडनमध्ये आगामी चित्रपटाच्या सेटवर आपला 75वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या चित्रपटात अ‍ॅकॅडमी अवॉर्ड विजेती एम्मा थॉम्पसनही काम करत आहे. यावेळी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्यांनी ‘पानी’ (Paani) चित्रपटावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘बर्‍याच दिवसांपासून ‘पानी’ माझी आणि मी ‘पानी’ची वाट पाहत होतो. मात्र, मार्चमध्ये परत आल्यानंतर मी तो चित्रपट बनवणार आहे.’ सुशांत सिंह राजपूतचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे (Director Shekhar Kapur decided to complete Sushant singh rajput’s dream project Paani).

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक शेखर कपूर हे ‘पानी’ चित्रपटावर एकत्र काम करत होते. सुशांतने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. मात्र, काही कारणाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, आणि त्यामुळेच सुशांत नैराश्यात गेला, असे बोलले जात होते.

मार्चमध्ये काम सुरू करणार…

शेखर कपूर सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनमध्ये त्यांच्या युनिव्हर्सल स्टुडिओच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या वेळी त्यांनी वाढदिवस देखील सेटवरच सेलिब्रेट केला आहे. ‘हा चित्रपट पूर्ण केल्यावर मी परत ‘पानी’ चित्रपटाकडे वळेन. बर्‍याच काळापासून ‘पानी’ माझी आणि मी ‘पानी’ची वाट पाहत आहे. या चित्रपटात आता कोण नायक होईल, याचा अजून विचार केला नाही. सध्यातरी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मी लंडनमध्येच असणार आहे’, असे शेखर कपूर म्हणाले.

सुशांतच्या आठवणींना उजाळा

काही दिवसांपूवी शेखर कपूर, मनोज वाजपेयी यांच्याबरोबर इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सुशांत आणि ‘पानी’ चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या होत्या. शेखर यांनी सुशांतच्या आयुष्यात अनेक चढ-उतार असल्याचे सांगितले होते. मी सुशांतबरोबर काम करायला खूप उत्साही होतो, असेही ते म्हणाले होते. यावेळी त्यांनी सुशांतच्या अनेक सवयींविषयी बोलत त्याच्या आठवणींना उजाळा दिला होता (Director Shekhar Kapur decided to complete Sushant singh rajput’s dream project Paani).

सुशांतच्या मृत्युनंतर शेखर यांची प्रतिक्रिया

सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर कपूर यांनी भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘मला माहित आहे की, तुला काय वेदना होत होत्या. मला त्या लोकांची सगळी कहाणी माहित आहे, ज्यांनी तुला इतकं निराश केलं. तू माझ्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडायचास. तुझ्याबरोबर जे घडलं, त्यात तुझा दोष नव्हता. हा सगळा त्यांच्या कृतीचा परिणाम आहे’, अश आशयची पोस्ट त्यांनी लिहिली होती.

यामुळे सुशांतबरोबर ‘पानी’ बनवता आला नाही…

  1. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सने सुशांत सिंह राजपूत याच्यासह तीन चित्रपटांचा करार केला होता. हे चित्रपट होते ‘ब्योमकेश बक्षी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि शेखर कपूरचा ‘पानी’.
  2. यशराज यांनी दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्याशी केलेल्या आपल्या जुन्या कराराची प्रत पोलिसांकडे दिली. या प्रतीत सुशांत यांच्यासमवेत तीन यशराज चित्रपटांचा उल्लेख होता, त्यापैकी दोन ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘व्योमकेश बक्षी’ चित्रपट बनले होते. तर, तिसरा चित्रपट ‘पानी’ होता जो काही कारणामुळे बंद केला गेला.
  3. शेखर कपूर ‘पानी’ हा चित्रपट हॉलिवूडसाठी बनवणार होते. पण, नंतर तो भारतात बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, यशराजने या प्रोजेक्टमधून हात काढल्यामुळे चित्रपटाचे बजेट खूप वाढले आणि चित्रपट तिथेच बंद करण्यात आला. या चित्रपटासाठी सुशांतने अनेक नवे चित्रपट नाकारले होते, असे म्हटले जाते. हा चित्रपट बंद पडल्याने सुशांत नैराश्यात गेला, असे ही म्हटले गेले होते.

(Director Shekhar Kapur decided to complete Sushant singh rajput’s dream project Paani)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.