फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? आज लाखो मुलींच्या हृदयावर करतो राज्य

सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटो व्हायरल होत असतात. स्टार्स आपल्या सोशल हँडलवर त्यांचे फोटो शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका बॉलिवूड अभिनेत्याचा आहे. तुम्ही त्याला ओळखू शकता का?

फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? आज लाखो मुलींच्या हृदयावर करतो राज्य
varun
| Updated on: Dec 28, 2023 | 5:27 PM

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कलाकार वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. अनेकांनी संघर्ष करत आज मोठं नाव कमवलं आहे. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ते जे काही शेअर करतात त्याची चाहत्यांमध्ये चर्चा होते. आज आम्ही तुम्हाला एका स्टार किडची ओळख करून देणार आहोत. अभिनयातून त्याने सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. हा अभिनेता कोण आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूडमध्ये त्याने धमाकेदार एन्ट्री केली होती. या फोटोत दिसणार्‍या या गोंडस मुलाला तुम्ही ओळखू शकत आहात का पाहा.

हा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा हँडसम अभिनेता वरुण धवन आहे. त्याच्या पहिल्याच सिनेमातून तो चर्चेत आला होता. आज त्याची मोठा फॅन फॉलोईंग आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत विवाह केला. वरुणने नताशाला चार वेळा प्रपोज केले. पण नताशा काय तयार होत नव्हती. पण नंतर शेवटी त्याला ती मिळालीच.

24 एप्रिल 1987 रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना पूत्ररत्न झाला. वरुण धवनने 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने अनेक विनोदी आणि गंभीर अभिनयाने लोकांना प्रभावित केले. त्याने मनोरंजक चित्रपट देखील केले. वरुण त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत राहिला. आलियापासून तापसी पन्नूपर्यंत त्याचं नाव जोडले गेले. पण त्याने फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले.

वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी अभिनेता गोविंदासोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण आपल्या मुलाला स्टार करण्यात अजून त्यांना हवे तसे यश मिळालेले नाही. वरुन धवन देखील अजून संघर्ष करत आहे. नक्कीच त्याला एक दिवस यश मिळेल अशा शुभेच्छा.