तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका गायिकेच्या निधनानंतर दु:ख झाले होते. त्यांनी शोक व्यक्त केला होता. आता ही गायिका कोण आहे? जाणून घ्या...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात कायमच चर्चेत असतात. त्यांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच त्यांची कठोण निर्णय घेण्याची क्षमता कायमच चर्चेत असते. पण एका गायिकेच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड दु:ख झालं होतं. त्यांनी आठ दिवसांसाठी मेरिकन ध्वज अर्धा झुकवून ठेवण्याचे आदेश दिले होते. आता ही गायिका कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला जाणून घेऊया…
कोण आहे ती गायिका?
प्रसिद्ध कंट्री सिंगर डॉली पार्टन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याच्या बातमीने जगभरातील संगीतप्रेमी आणि चाहते शोकात बुडाले आहेत. कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावपूर्ण व्हिडिओ शेअर करून ही दुःखद बातमी कळवली. त्यांच्या नातेवाइकांच्या मते, त्या गेल्या काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंजत होत्या आणि नॅशव्हिल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीताच्या जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरता येणार नाही.
डॉली पार्टन यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. टेनेसीतील एका अत्यंत गरीब कुटुंबातून बाहेर पडून त्यांनी आपल्या कष्टाळूपणा आणि प्रतिभेच्या जोरावर जगभर ओळख निर्माण केली. सहा दशकांपेक्षा जास्त काळाच्या प्रवासात त्यांनी १०० दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड्स विकले आणि ११ ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावावर केले. त्यांचे ‘जोलीन’, ‘नाईन टू फाईव्ह’ आणि ‘आय विल ऑलवेज लव्ह यू’ सारखे गाणे आजही लोकांच्या ओठांवर आणि प्लेलिस्टमध्ये असतात. संगीतासोबतच त्यांनी चित्रपट, व्यवसाय आणि सामाजिक कार्यातही आपली खास ओळख निर्माण केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला शोक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले की हे कोट्यवधी लोकांसाठी मोठे नुकसान आहे आणि त्यांच्यासारखे दुसरे कोणीही कधी होऊ शकणार नाही. त्यांनी सन्मानार्थ अमेरिकन ध्वज एक आठवडा अर्धा झुकवून ठेवण्याचा आदेशही दिला आहे. डॉली यांची खासियत ही होती की त्यांना सर्व विचारसरणीचे लोक आवडत. अमेरिकेच्या एका मोठ्या सर्वेक्षणातही त्या एकमेव अशा व्यक्तिमत्त्व होत्या ज्यांना सर्व राजकीय पक्षांचे लोक सारखेच प्रेम देत.
सर्वोच्च सन्मान घेण्यास का केला होता नकार?
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात डॉली पार्टन यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम देण्याची ऑफर दोनदा देण्यात आली होती. मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की पहिल्यांदा त्यांचे पती कार्ल डीन यांची तब्येत ठीक नव्हती, म्हणून त्या जाऊ शकल्या नाहीत. दुसऱ्यांदा कोरोना महामारीच्या धोक्यामुळे त्यांनी प्रवास टाळला. नंतर जेव्हा जो बायडेन यांच्या काळात ही बाब पुन्हा उठली, तेव्हा त्यांनी सांगितले की त्या कोणत्याही राजकीय वादात पडू इच्छित नाहीत.