Dosanjh Dosanjh : ‘बॉम्ब फेकला तरी तुमच्यावर..’ धमक्यांवर दिलजीत दोसांझचं हटके उत्तर, कॉन्सर्टमध्ये नेमकं काय म्हणाला?
Dosanjh Dosanjh : बॉम्बनं उडवण्याच्या धमक्यांवर गायक दिलजीत दोसांझ याने हटके उत्तर दिलं आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीत याची हटके प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्ही बॉम्ब फेकला तरी, माझ्याकडून तुम्हाला प्रेमच दिलं जाईल.... सध्या सर्वत्र दिलजीत याचीच चर्चा रंगील आहे.

Singer-actor Diljit Dosanjh : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्याच्या शोला बॉम्बस्फोटाच्या धमक्या देऊन चाहत्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा दिलजीतने केला आहे. या धमक्यांना घाबरून न जाता दिलजीतने महालक्ष्मी रेसकोर्सवरील कॉन्सर्टमध्ये हटके अंदाजात उत्तर दिलं. ‘तुम्ही बॉम्ब फेकला तरी माझ्याकडून तुम्हाला प्रेमच दिलं जाईल,’ अशा शब्दांत दिलजीत याने आपली भूमिका मांडली. लोकांना घाबरवून आणि धमकावून माझ्या शोला येण्यापासून रोखलं जात असल्याचंही त्याने म्हटलं.
यावेळी दिलजीतने आपल्या बोलण्यातून प्रेम आणि सकारात्मकतेचा संदेश दिला. धमक्यांना भीतीने उत्तर देण्याऐवजी प्रेमाने उत्तर देण्याचा त्याचा हा अंदाज उपस्थित चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. दरम्यान, कॉन्सर्टपूर्वी धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा मोठा बंदोबस्त केला होता. कार्यक्रमस्थळी 500 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानेही परिसराची तपासणी केली. दिलजीतने यावेळी मुंबई पोलिसांचे आभार मानत चाहत्यांनी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं. ‘शहरों में बारूदों का मौसम है, गाँव चलो ये अमरूदों का मौसम है,’ या असं म्हणत त्याने शांततेचा संदेश दिला. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दिलजीतने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही चाहत्यांनी मोठ्या संख्येने कॉन्सर्टला हजेरी लावली. त्यामुळे दिलजीतने चाहत्यांचेही विशेष आभार मानले.
कॉन्सर्टला मनसेकडून देखील झालेला विरोध
गायक दिलजीत दोसांझ याच्या मुंबईतील कॉन्सर्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवलेला महालक्ष्मी रेसकोर्स आणि NSCI डोम येथे होणाऱ्या कार्यक्रमात ड्रग्ज सेवन होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेने केलेला. कॉन्सर्ट रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिलेला.
दिलजीत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘इश्क दा उडा अडा’ या अल्बममधून त्याने संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘लक्क 28 कुड़ी दा’, ‘पटियाला पेग’, ‘5 तारा’ यांसारख्या गाण्यांनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनय विश्वात देखील, त्याने स्वतःची ओळख भक्कम केली आहे. अभिनेत्याने ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘पंजाब 1984’, ‘उडता पंजाब’, ‘गुड न्यूज’ आणि ‘अमर सिंह चमकीला’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकरात चाहत्यांचं मनोरंज कलं. दिलजीत याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.