Drishyam 2: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ची कमाई फास्ट ट्रॅक मोडवर सुरू

'दृश्यम 2'ची दुसऱ्या दिवशी दमदार कमाई; मल्टिप्लेक्समध्ये वाढवले शोज

Drishyam 2: अजय देवगणच्या दृश्यम 2ची कमाई फास्ट ट्रॅक मोडवर सुरू
Drishyam 2
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 20, 2022 | 10:51 AM

मुंबई- अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ची कमाई ‘फास्ट-ट्रॅक मोड’वर सुरू असल्याचं पहायला मिळतंय. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपये कमावले. तर शनिवारच्या कमाईत 45 टक्क्यांची वाढ झाली. शनिवारी या थ्रिलर चित्रपटाने 21.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच या चित्रपटाची कमाई 35 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, रजत कपूर, सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत.

दृश्यम 2 ची आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 15.38 कोटी रुपये
शनिवार- 21.59 कोटी रुपये
एकूण- 36.97 कोटी रुपये

प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता काही मल्टिप्लेक्सेसमध्ये या चित्रपटाचे मध्यरात्रीचे शोज लावण्यात आले. दृश्यम 2 ने कार्तिक आयर्नच्या ‘भुल भुलैय्या 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. या हॉरर कॉमेडीने पहिल्या दिवशी 14.11 आणि दुसऱ्या दिवशी 18.34 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

दृश्यम 2 च्या कमाईचे आकडे हे अजय देवगणसाठी दिलासा देणारे आहेत. कारण या वर्षी प्रदर्शित झालेले त्याचे इतर दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. रनवे 34 आणि थँक गॉडने अपेक्षित कामगिरी केली नव्हती.

दृश्यम 2 हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाला सीक्वेल आहे. हे दोन्ही चित्रपट त्याच नावाने प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत.