Drishyam 2: अवघ्या 7 दिवसांत ‘दृश्यम 2’ने ‘भुल भुलैय्या 2’ला टाकलं मागे; जाणून घ्या कमाई..

| Updated on: Nov 25, 2022 | 10:01 AM

पहिल्या आठवड्यात 'दृश्यम 2'ची जबरदस्त कमाई; विजय साळगावकरने रुह बाबाला दिली मात

Drishyam 2: अवघ्या 7 दिवसांत दृश्यम 2ने भुल भुलैय्या 2ला टाकलं मागे; जाणून घ्या कमाई..
Drishyam 2
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला. अवघ्या सात दिवसांत ‘दृश्यम 2’ने कमाईचा आकडा गाठला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या चित्रपटाच्या सात वर्षांनंतर हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन-

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून अजय देवगणच्या या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. आता पहिल्या आठवड्यात दृश्यम 2 ने 104.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2022 या वर्षात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर दृश्यम 2 हा अजय देवगणच्या करिअरमध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा तेरावा चित्रपट आहे.

आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 15.38 कोटी रुपये
शनिवार- 21.59 कोटी रुपये
रविवार- 27.17 कोटी रुपये
सोमवार- 11.87 कोटी रुपये
मंगळवार- 10.48 कोटी रुपये
बुधवार- 9.55 कोटी रुपये
गुरुवार- 8.70 कोटी रुपये
एकूण- 104.74 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

अजय देवगणच्या या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. कार्तिक आर्यनच्या भुल भुलैय्या 2 ने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. भुल भुलैय्या 2 चं लाइफटाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन 185.92 कोटी रुपये इतकं होतं. आता या आकड्यालाही ‘दृश्यम 2’ पार करेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दृश्यम 2 ने 100 कोटींचा टप्पा सहजतेने पार केला. मात्र 25 नोव्हेंबरपासून वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा ‘भेडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दृश्यम 2 च्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.