Drishyam 3 : बॉक्स ऑफिसवर विजय साळगावकरचा बोलबाला, ‘दृश्यम 3’नं कमावला कोट्यवधींचा गल्ला; मोडीत काढले गाजलेल्या सिनेमांचे रेकॉर्ड

Drishyam 3 Box Office Collection : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सिनेमाची कमाई जाणून घेऊया.

Drishyam 3 : बॉक्स ऑफिसवर विजय साळगावकरचा बोलबाला, दृश्यम 3नं कमावला कोट्यवधींचा गल्ला; मोडीत काढले गाजलेल्या सिनेमांचे रेकॉर्ड
| Updated on: Oct 05, 2026 | 10:02 PM

अजय देवगणचा चित्रपट ‘दृश्यम ३’ बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे विक्रम मोडत आहे. या चित्रपटानं भारतात पहिल्याच विकेंडमध्ये 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आता आठवड्याच्या दिवसांचीही दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एक यशस्वी फ्रँचायझी म्हणून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ‘दृश्यम 3′ या सिनेमानं पहिल्या सोमवारी जबरदस्त कमाई केली. येत्या विकेंडमध्येही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सज्ज आहे.

‘दृश्यम ३’ ची चौथ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई

Loading...

सॅकनिल्कनुसार, ‘दृश्यम ३’ ने पहिल्याच दिवशी 62 कोटी रुपये कमावले. आपल्या पहिल्याच दिवशी, या चित्रपटानं ‘पठाण’ सारख्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. दुसऱ्या दिवशीही सिनेमानं 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि 53.50 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारीही चित्रपटाला वीकेंडचा फायदा झाला आणि 61 कोटी रुपये कमावले. त्यानंतर, सिनेमाच्या ओपनिंग वीकेंडची कमाई 176.5 कोटी रुपयांवर पोहोचली.

‘दृश्यम 3’ 2026 मधील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

इतकंच नाही, तर अजय देवगणचा चित्रपट ‘दृश्यम 3’ हा 2026 मधील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यानं ‘धमाल 4’ चा विक्रम मोडला आहे. आपल्या ओपनिंग वीकेंडमध्ये, चित्रपटानं ‘अवारपन 2’ आणि ‘टॉक्सिक’ चे विक्रम मोडले होते. आता, सोमवारीही ‘दृश्यम 3’नं विक्रम मोडला आहे.

2026 मधील सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 सिनेमे

१. धुरंधर २ – ₹११८६.३२ कोटी

२. बॉर्डर २ – ₹३६२.७६ कोटी

३. हनुमान अंश – ₹३२१.७३ कोटी

४. मिर्झापूर द मुव्ही – ₹२३२.९२ कोटी

५. भूत बंगला – ₹१९९.२३ कोटी

६. दृश्यम ३ – ₹१९१.०५ कोटी

७. धमाल ४ – ₹१७७.९२ कोटी

८. आवारापन २ – ₹१५६.१२ कोटी

९. टॉक्सिक हिंदी – ₹१४३.९२ कोटी

१०. वेलकम टू द जंगल – ₹१३७.९३ कोटी

दरम्यान, अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाच्या चार दिवसांतील नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, कोइमोईच्या वृत्तानुसार चित्रपटाचं बजेट 128 कोटी रुपये होतं, तर सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं तीन दिवसांत, म्हणजेच पहिल्या वीकेंडमध्ये, जगभरात 272.80 कोटी रुपये कमावले आणि केवळ तीन दिवसांत 113.13% नफा कमावला. चौथ्या दिवसाची अंतिम आकडेवारी रात्री 10:30 पर्यंत उपलब्ध होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us