
नुकत्याच झालेल्या वेव्हज समिट 2025 मध्ये अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रसिद्ध भारतीय निर्माती आणि एमी पुरस्कार विजेती एकता आर कपूरने देखील हजेरी लावली होती. एकता कपूरने राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे भारतीय नाटकांचा आणि मालिका स्वरूपांचा वाढता प्रभाव यावर तिचे मत मांडले आहे. याचा प्रभाव आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे.
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कंटेंटचे राज्य
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कंटेंटचे राज्य उभारण्यात यश मिळवल्यानंतर जागतिक कथाकथनाबद्दलही एकताला विचारण्यात आलं तेव्हा तिने यावर आपलं स्पष्ट मत मांडत म्हटलं की, “कथा सांगण्याची पद्धत अशी असावी की ती थेट हृदयाशी जोडली जाईल.” आणि खरोखरच तिचा कंटेट हा सामान्य माणसांच्या आयुष्याशी जोडणारा असतो.
“भाषा आता अडथळा नाही”
तसेच तिने पुढे सांगितले की जगभरातील प्रेक्षक कोरियन, तुर्की, अमेरिकन, स्पॅनिश आणि युरोपियन अशा विविध संस्कृतींमधील कथा स्वीकारत आहेत. “जागतिक प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क्सनी हे सिद्ध केले आहे की भाषा आता अडथळा राहिलेला नाही. डबिंगमुळे लोक कथांचा आनंद घेतात, परंतु प्रत्यक्षात ते कथेशी जोडले जातात,” असही तिने म्हटलं. हे कंटेंट वापरात एक महत्त्वपूर्ण बदल असल्याचंही तिने म्हटलं. या बदलामुळे आता विविध संस्कृतींमधील कथा जागतिक स्तरावर पोहोचत आहेत.
भारतीय कथांच्या जागतिक गोष्टींच्या आगमनाबाबत आशावाद
एकता कपूरने भारतातील कथाकथनाच्या समृद्ध वारशाबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “आपल्याकडे कथाकथनाची सर्वात जुनी आणि प्रदीर्घ परंपरा आहे. आणि तीच आपली खरी जमापुंजी आहे.” तिने भारतीय कंटेंटच्या जागतिक प्रसारात पूर्वीच्या व्यावहारिक अडचणींना मान्यता दिली. परंतु बदलत्या परिस्थितीबद्दल आणि भारतीय कथांच्या जागतिक गोष्टींच्या आगमनाबाबत तिने आशावादही व्यक्त केला आहे.
एकताची कंटेंटबाबत नवी योजना
भारतीय चित्रपट उद्योगाच्या जागतिक स्तरावरील ओळखीवर प्रकाश टाकताना एकता म्हणाली, “आम्ही तिथे पोहोचत आहोत. आता ते जातीय नसावे. मला वाटते की आपण एका महत्त्वपूर्ण वळणावर आहोत.” हे सांस्कृतिक आणि वांशिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन व्यापक जागतिक आकर्षण निर्माण करणाऱ्या सार्वत्रिक कथाकथनाकडे वळण्याचे तिने संकेत दिले आहेत.
“वीवीएएन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट”ची तयारी
शेवटी, कपूर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि एक स्पष्ट संदेश दिला की, भारतीय कंटेंटने आता सीमा आणि उपशीर्षके ओलांडून थेट मानवी हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या कथा सांगितल्या पाहिजेत. ती सध्या तिच्या पुढील निर्मिती, “वीवीएएन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट”ची तयारी करत आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.