
मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याच्यावर काही दिवसांपुर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडलाय. थेट एल्विश यादव याच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय. हे सर्व सुरू असतानाच थेट एल्विश यादव याने सलमान खान याच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे हा फोटो बिग बाॅसच्या मंचावरील आहे. हा फोटो शेअर करत एल्विश यादव याने एक अत्यंत खास असे कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहे.
एल्विश यादव याचे नाव थेट सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये आल्याने सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. एल्विश यादव याच्याकडून सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले गेले. इतकेच नाही तर त्याच्या पार्टीमध्ये काही साप देखील जप्त करण्यात आले. या पार्टीमध्ये सापाच्या विषाची नशा केली जात असत.
एल्विश यादव याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. एल्विश यादव याने चाैकशीमध्ये काही मोठे खुलासे देखील केले आहेत. एल्विश यादव याने मुंबईमध्ये देखील सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन केले का यावर पोलिस हे तपास करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये बाॅलिवूडची एक गुप्त पार्टी झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
एल्विश यादव याच्या संपर्कात काही बाॅलिवूड स्टार असल्याचे देखील सांगितले जातंय. सलमान खान याच्यासोबतचा फोटो शेअर करत एल्विश यादव याने लिहिले की, काळ हा विचित्र गोष्ट आहे, त्याच्याशी जुळवून घेणे, तू सुद्धा खूप जवळ होतास, आता खूप काही बदलले नक्कीच आहे. एल्विश यादव याला नेमके काय म्हणायचे हे कळू शकले नाहीये. मात्र, त्याने सलमान खान याच्यासोबत फोटो शेअर केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.
एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा कायमच सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना एल्विश यादव हा दिसतो. एल्विश यादव याने काही दिवसापूर्वी थेट दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. दिल्लीमध्येही त्याचे आलिशान घर आहे.