‘हा आमचा इमरान हाश्मी नाही हो, ‘आवारापन – 2’ मध्ये एकही किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज !

अभिनेता इमरान याचा 'आवारापन-२' रिलीज झाला आहे. या दोन तासांच्या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी याची स्पेशालिटी असलेला एकही किसींग सीन नसल्याने चाहते थोडे नाराज झाले आहेत.

हा आमचा इमरान हाश्मी नाही हो, आवारापन - 2 मध्ये एकही किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज !
emraan hashmi
| Updated on: Aug 17, 2026 | 4:57 PM

Awarapan 2 Fans Upset Over No Kissing Scene: तीन दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या इमरान हाश्मी याच्या ‘आवारापन 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली आहे. मात्र या दोन तासांच्या चित्रपटात एकही किसिंग सीन नसल्याने इमरान हाश्मीचे चाहते नाराज झाले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स शेअर केले जात आहेत. त्यातच आता ‘आवारापन 3’ची देखील घोषणा करण्यात आली आहे.

इमरान हाश्मी हा अभिनेता सिरियल किसर म्हणून ओळखला जात होता. त्याच्या चित्रपटात चुंबन दृश्यांची भरमार असणारच अशी अपेक्षा चाहते करत असतात. मात्र, काल परवा रिलीज झालेल्या आवारापन – २ मध्ये एकही किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी या चित्रपटाला गर्दी केली आहे. मात्र, दोन तासांच्या चित्रपटात एकही किसिंग सीन नसल्याने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी सोबत दिशा पटणी आहे. या चित्रपटात किसींग सीन नसल्याने नाराज चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध मजेदार मीम्स शेअर केले आहेत.

इम्रान हाश्मी याच्या या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ७७.६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, चित्रपटात किसिंग सीन नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर मजेशीर मीम्स शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

एका युझरने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलयं, ‘ना ये हमारा इमरान हाशमी नहीं है, दो घंटे की मूवी में एक भी किसिंग सीन नहीं है।’

अन्य एका तरुणीने ट्विट केलंय की “मी खरं तर माझ्या आईला म्हणाले होते की आपण दुसरा चित्रपट पाहूयात, कारण या चित्रपटात इम्रान हाश्मी आहे. पण नंतर कळले की यात एकही किसिंग सीन नव्हता आणि कथा खूप चांगली होती.”

आणखी एका युझरने ट्विट करत म्हटले की “इमरान हाश्मीला एका रोमँटिक चित्रपटात कास्ट केले गेलेय, पण किसिंग सीन नाही ? भावा, नॉस्टेल्जिया एक किसिंग सीन टाकू शकला असतास का?”

येथे पोस्ट पाहा –

१९ वर्षानंतर इमरानचा सिक्वल

इमरान हाश्मी याच्या आवारापन-२ ने तीन दिवसात बॉक्स ऑफीसवर ७७.६१ कोटींची कमाई केली आहे.यातील इमरान हाश्मी याच्या अभिनयाची स्तूती होत आहे. मात्र, इमरानची स्पेशालिटी असलेला किसींग सीन नसल्याने चाहते थोडे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्याने जबरदस्त मीम्स शेअर केले आहेत. ‘मर्डर’ चित्रपटातून साल २००४ साली अभिनेता इमरान हाश्मी याने करियरची सुरुवात केली होती. ‘आवारापन’ हा चित्रपट २००७ रोजी रिलीज झाला होता. आता १९ वर्षानंतर त्याचा सिक्वल ‘आवारापन-२’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us