
अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी पूनम पांडे हिने तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून चर्चेत आली होती. त्यामुळे पूनम पांडेवर नंतर खूप टीका ही झाली. पूनम पांडे वादामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी तिचा बाथरूम व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. त्यावेळी लोकांना वाटले की पूनमनेच प्रसिद्धीसाठी तिचा व्हिडिओ लीक केला आहे. आता अभिनेत्रीने त्या लीक झालेल्या व्हिडिओचे सत्य सांगितले आहे.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडेने सांगितले की, तिचा बाथरूमचा व्हिडिओ तिच्या एक्स बॉयफ्रेंडने लीक केला होता. ती म्हणाली, “मला ते अजूनही आठवतंय आणि मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही एकमेकांशी भांडत होतो. मला स्वतःला वाचवायचं होतं. त्याने ट्रिमर उचलला आणि माझे केस ट्रिम करणार होता. कसं तरी मी त्याच्याकडून ट्रिमर हिसकावून घेतला. मी खोलीतून पळून गेले आणि रडत रडत घरी पोहोचले.
पूनम पांडेने पुढे सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला तिचा बाथरूमचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला की जर तू परत आला नाहीस, तर मी इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ पोस्ट करेन. मी त्याला सांगितले की मी परत येणार नाही. तो म्हणाला की तो खरोखर व्हिडिओ पोस्ट करेल आणि त्याने तसे केले. पूनम म्हणाली की, तो असे करेल असे मला कधीच वाटले नव्हते. मला वाटलं की तो एवढ्या खालची पातळी गाठणार नाही.
‘आयुष्य उद्ध्वस्त केले’
पूनम पांडेने सांगितले की, या व्हिडिओने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे मित्र त्याचे कौतुक करत होते. पूनम पांडेने सांगितले की, त्याचे मित्र त्याला सांगत होते की, ‘तू रॉकस्टार आहेस, बॉस’, ‘तू हिरो झाला आहेस’.
जेव्हा पूनम पांडेचा बाथरूम व्हिडिओ लीक झाला होता, तेव्हा यूट्यूबने तो ब्लॉक केला होता. पूनम पांडे नुकतीच कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्ये दिसली होती. त्याचबरोबर पूनम काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे.