Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…

| Updated on: Mar 29, 2021 | 2:49 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओबद्दल असा दावा केला जात आहे की, या व्हायरल व्हिडीओत ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे, ती व्यक्ती दुसरे कोणी नाही तर, बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आहे.

Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य...
अजय देवगण
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay devgn) नेहमीच आपल्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. नुकताच त्याच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अत्यंत धक्कादायक आहे. या व्हायरल व्हिडीओनुसार दिल्लीत मध्यरात्री दोन गटात मोठी हाणामारी झाली होती, या मारामारीच्या व्हिडीओमध्ये अजय देवगणचे नाव पुढे येत आहे (Fact Check  Actor Ajay devgn betan in delhi know the truth behind this viral video).

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओबद्दल असा दावा केला जात आहे की, या व्हायरल व्हिडीओत ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे, ती व्यक्ती दुसरे कोणी नाही तर, बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आहे. तथापि, ही गोष्टी पूर्णपणे चुकीची आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात होता की, या व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेल्या व्यक्तीची शरीरयष्टी अजय देवगणसारखे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असाही दावा केला गेला आहे की, अजय देवगण या घटनेत असून, त्यावेळी तो नशेच्या अवस्थेत होता. अभिनेत्रीच्या कार पार्किंगवरुन भांडण सुरू आहे, त्यानंतर हे प्रकरण अतिशय घातक वळण घेते आहे.

पाहा व्हिडीओ :

मात्र, या व्हायरल व्हिडीओमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेला व्यक्ती हा अजय देवगण नसून, दुसराच कोणीतरी आहे (Fact Check  Actor Ajay devgn betan in delhi know the truth behind this viral video).

नुकत्याच एका वापरकर्त्याने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती मारहाण करताना दिसून येतो. व्हिडीओ पोस्ट करताना या व्यक्तीने लिहिले की, ‘तो अजय देवगन आहे की नाही हे मला माहिती नाही. पण, शेतकरी आंदोलनाबाबत लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरत आहे, असा दावा केला जात आहे की तो अजय देवगण आहे.’

अजय दिल्लीत गेलेलाच नाही!

‘‘तान्हाजी’ चित्रपटाच्या प्रमोशननंतर अजय देवगण दिल्लीमध्ये गेलेलाच नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दिल्लीच्या एका पब बाहेरील या व्हिडीओ दिसणारा व्यक्ती अजय नाही. या सगळ्या अफवा आणि खोट्या बातम्या आहेत. आम्ही माध्यमांना विनंती करतो, की त्यांनी अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवावे. यामुळे एखाद्याची नाहक बदनामी होते. सध्या अजय हा मुंबईतच असून, त्याच्या आगामी मैदान या चित्रपटात व्यस्त आहे. गेल्या 14 महिन्यात त्याने दिल्लीमध्ये पाऊलही ठेवलेलं नाही’, असे अजयच्यावतीने त्याच्या टीमने जाहीर केले आहे. या व्हायरल व्हिडीओला उत्तर देताना त्यांनी हे निवेदन जारी केले आहे.

(Fact Check  Actor Ajay devgn betan in delhi know the truth behind this viral video)

हेही वाचा :

Aggabai Sunbai | प्रेक्षकांना येतेय जुन्या ‘शुभ्रा’ची आठवण, ‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटला गुडबाय!

Rhea Chakraborty | होळीच्या निमित्ताने रियाला आली सुशांतची आठवण, पोस्ट लिहित म्हणाली…