Cricket Fever | आमिर खान क्रिकेटमध्ये दंग, बच्चे कंपनीसोबत चौकार-षटकारांची बरसात, सेल्फी घेतावेळी खास रिअ‌ॅक्शन!

Cricket Fever | आमिर खान क्रिकेटमध्ये दंग, बच्चे कंपनीसोबत चौकार-षटकारांची बरसात, सेल्फी घेतावेळी खास रिअ‌ॅक्शन!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नुकताच आपल्या कुटूंबियाना भेटण्यासाठी देहरादूनला गेला होता.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 08, 2021 | 12:48 PM

देहरादून : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नुकताच आपल्या कुटूंबियांना भेटण्यासाठी देहरादूनला गेला होता. त्यावेळी आमिरने त्याच्या घराजवळील मुलांसोबत क्रिकेट खेळले. आमिरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो आपल्या लहान मित्रांसह क्रिकेट खेळताना दिसत आहे आणि मुलांसोबत क्रिकेट खेळताना तो चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. (Actor Aamir Khan’s video playing cricket goes viral)

आमिर खानचा हा व्हायरल व्हिडिओ विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. व्हिडिओमध्ये आमिर खानदेखील मुलांसोबत बरीच मस्ती करताना दिसत आहे. आमिरसोबत मुले सेल्फी आणि ग्रुप फोटो घेत असल्याचे दिसून येत आहेत. निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि करड्या रंगाची ट्राऊझर्समध्ये आमिर दिसत आहेत.

आमिर खान लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान एका पंजाबी मानसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मागील वर्षी 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अद्वैत चौहान दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

आमिर खानची मुलगी इरा हिने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता. मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. तरीही सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते, असे इराने व्हिडीओत म्हटले होते.

संबंधित बातम्या : 

Photos | रिया चक्रवर्तीची मित्रांबरोबर पार्टी, दंगा आणि बरंच काही, सुशांतचे चाहते नाराज

Reaction | तैमूरला चक्क स्थळ आलं? करिनाची तगडी प्रतिक्रिया!

(Actor Aamir Khan’s video playing cricket goes viral)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें