Fact Check: ‘अवतार ३’मध्ये गोविंदाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ

Fact Check: सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ 'अवतार ३' चित्रपटातील एक सीन आहे. या सीनमध्ये गोविंदा दिसत आहे. त्यामुळे आता खरच गोविंदाने या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे का चला जाणून घेऊया...

Fact Check: अवतार ३मध्ये गोविंदाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ
Govinda
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 23, 2025 | 1:43 PM

जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार’ चित्रपटाबाबत बॉलिवूड अभिनेता गोविंदाने धक्कादायक दावा केला होता. या चित्रपटाची ऑफर आल्याचे गोविंदाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आजही सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. गोविंदाने दावा केला होता की ‘अवतार’साठी तो पहिली पसंती होता आणि पण त्याने या चित्रपटाला नाकार दिला होता. गोविंदाच्या या दाव्यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलही केले गेले होते. त्याची पत्नी सुनीतानेही अभिनेत्याच्या या वक्तव्यावर टोमणा मारत सांगितले होते की तिला माहिती नाही की गोविंदांने हा चित्रपट नेमका कधी ऑफर झाला होता. आता पुन्हा एकदा गोविंदा ‘अवतार’ चित्रपटामुळे चांगलात चर्चेत आहे. ‘अवतार ३’ प्रदर्शित होताच गोविंदाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे चर्चा सुरू आहेत की गोविंदा या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. चला जाणून घेऊया की इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटों मागचे सत्य काय आहे?

जेम्स कॅमरूनचा नवा चित्रपट ‘अवतार: फायर अंड अॅश’च्या रिलीजनंतर सोशल मीडियावर अचानक असे व्हिडीयो आणि फोटो व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये दावा केला जात होता की बॉलिवूड स्टार गोविंदाने फिल्ममध्ये सरप्राइज कॅमियो केला आहे. पण सत्य हे आहे की हे सर्व फेक आहे. खरे तर, अवतार ३ चित्रपटामधील गोविंदाचे हे फोटो आणि क्लिप एआय जनरेटेड आहेत. एआयद्वारे बनवलेल्या या फोटोमुळे लोकांना वाटत आहे की गोविंदा या चित्रपटात पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसत आहे. पण तसे नाही.

गोविंदाच्या व्हायरल फोटोचे काय आहे सत्य?

एआयने बनवलेल्या व्हिडीओमध्ये गोविंदाला निळ्या त्वचेच्या नावीच्या रूपात दाखवले आहे, ज्यामुळे चाहते गोंधळात पडले. हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ खरे तर इतके वास्तववादी दिसत आहेत की प्रत्येकजण या वादाचा भाग बनला आहे की खरंच गोविंदा सिनेमामध्ये आहे का? ज्यांनी सिनेमा पाहिला नाही त्यांना हे खरे वाटत आहे.

फेक व्हिडिओमध्ये गोविंदाला अवतारच्या सिग्नेचर ब्लू रंगात दाखवले आहे, ज्यात तो त्याचा प्रसिद्ध “बत्ती बुझा” डायलॉग दमदार अंदाजात बोलताना दिसत आहेत. एका व्हायरल फोटोमध्ये तर प्रेक्षक सिनेमा हॉलमध्ये बसलेले आहेत आणि स्क्रीनवर गोविंदा रंगबिरंगी गुजराती स्टाइल जॅकेटमध्ये जेक सुली सोबत फ्रेम शेअर करताना दिसत आहे.