Mr Faisu Wedding : मिस्टर फैजू बोहल्यावर चढणार? अत्यंत महागडी लग्नपत्रिका व्हायरल; बायको नेमकी कोण?

सोशल मीडिया स्टार मिस्टर फैजू (फैसल शेख) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लग्नाच्या व्हायरल आमंत्रण पत्रिकेमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि उत्सुकता वाढली आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोमतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Mr Faisu Wedding : मिस्टर फैजू बोहल्यावर चढणार? अत्यंत महागडी लग्नपत्रिका व्हायरल; बायको नेमकी कोण?
| Updated on: Sep 28, 2026 | 9:28 PM

सोशल मीडियाच्या जगाचा ‘किंग’ आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्टार मिस्टर फैजू (फैसल शेख) सध्या चर्चेत आहे. पण यावेळेस तो एखाद्या व्हिडीओमुळे किंवा स्टंटमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मि. फैजू हा लवकरच बोहोल्यावर चढणार आहे, असं बोलल जात आहे. यापूर्वी त्याचं नाव जन्नत जुबैरसोबत जोडलं गेलं होतं. मात्र आता फैजूची होणारी पत्नी कोण असेल, या विचाराने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली असून ते जाणून घेण्याची उत्सुकता देखील वाढली आहे.

सोशल मीडियावर गाजणारा आणि अभिनेता फैसल शेखच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. गेल्या काही काळापासून त्याच्या लग्नाबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात होते. खुद्द Mr Faisu नेही आपल्या व्लॉग्स आणि मुलाखतींमधून लग्नाचे संकेत दिल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. अशातच त्याच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका असल्याचे सांगितले जाणारे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्या फोटतील झलकांमध्ये दिसणाऱ्या नावांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Loading...

MR. FAISU & TANYA नावाची झलक व्हायरल

Mr Faisu याच्या अलीकडील व्लॉगमध्ये लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेची एक झलक दिसली होती. त्यानंतर त्याच्या एका पाहुण्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फुलांनी सजवलेल्या बोर्डवर MR. FAISU & TANYA अशी नावं लिहीलेली दिसली. हे दृश्य समोर येताच Tanya ही फैजूची होणारी पत्नी आहे का?, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

 

मात्र, याच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आमंत्रण पत्रिकेवर Mohd Mudassir आणि Nikhat Fatima अशी नावं नमूद असल्याचंही दिसलं. या पत्रिकेनुसार निकाह 18 ऑक्टोबर 2026 रोजी, तर रिसेप्शन 19 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या तपशीलांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ही पत्रिका खरोखरच फैजूच्या लग्नाशी संबंधित आहे का, तसेच त्याची होणारी वधू कोण आहे, याबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडला आहे.

वधूचं नाव अजून अधिकृतपणे जाहीर नाही

सध्या ‘Tanya’ हे नाव चर्चेत आले असले तरी फैजू किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप वधूच्या नावाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या या झलकांमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली असली, तरी त्यावरून लग्नाबाबत निश्चित निष्कर्ष काढता येणार नाही. बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण Mr Faisu चं खरे नाव Faisal Shaikh असून तो Shaikh Muhammad Mudassir Faisal या नावानेही ओळखला जातो. त्यातच या आमंत्रण पत्रिकेवर दिसणाऱ्या नावांमुळे चाहत्यांमध्ये या लग्नाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us