
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) बघायला मिळते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. नेहमीच उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.
उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाहीये. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच झाडााच्या सालीपासून कपडे तयार केले होते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई ही उर्फी जावेद करते.
नुकताच परत एकदा उर्फी जावेद ही अतरंगी लूकमध्ये दिसली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले. उर्फी जावेद हिच्यावर आता टिका होत आहे. उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा नवा लूक दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
अझिओचे ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये उर्फी जावेद ही अतरंगी लूकमध्ये पोहचली होती. उर्फी जावेद हिने गोल्ड ब्रेस्ट प्लेटचा आऊटफिट घातला होता. आता हा आऊटफिट कसा तयार करण्यात आला. याचाच व्हिडीओ उर्फी जावेद हिने शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस POP प्लास्टरपासून तयार करण्यात आला आहे.
अझिओच्या ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये उर्फी जावेद ही गोल्ड ब्रेस्ट प्लेट घालून गेल्याने आता ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. उर्फी जावेद हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. एकाने लिहिले की, घरातील लोक हिला काहीच म्हणत नाहीत का? दुसऱ्याने म्हटले की, ही कपडेच का घालते हेच मला मुळात कळत नाही. आता उर्फी हिच्यावर या कपड्यांमुळे मोठ्या प्रमाणात टिका होताना दिसत आहे.