AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय खन्नासोबत मी काम करणार नाही, तो खूपच..; फराह खानने सांगितला धक्कादायक किस्सा

Akshaye Khanna: नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने अभिनेता अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

अक्षय खन्नासोबत मी काम करणार नाही, तो खूपच..; फराह खानने सांगितला धक्कादायक किस्सा
फराह खान, अक्षय खन्नाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 3:10 PM
Share

बॉलिवूडमधील कलाकारांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सेटवरील वागणुकीचीही चर्चा होत असते. आता अभिनेता अक्षय खन्ना याच्याबाबत दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने केलेला एक खुलासा चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टमध्ये फराह खानने अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यासोबत काम करणं खूप कठीण असल्याचं म्हटलं आहे. फराह खानने कोरिओग्राफर्स बोस्को आणि सीझर यांच्या ‘डान्स मस्ती’ पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितला आहे. तिला सेटवर कोणता अभिनेता सर्वात कठीण वाटला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने अक्षय खन्नाचं नाव घेतलं.

1990च्या दशकात अक्षयसोबत काम करताना मला अनेक अडचणी जाणवत होत्या. त्या काळात तो खूप चिडचिड करायचा आणि शूटिंगदरम्यान उभं राहायलाही त्याची तयारी नसायची. त्यामुळे गाण्यांची कोरिओग्राफी करताना मला खूप त्रास व्हायचा, असं फराह खान म्हणाल्या. अक्षयच्या या वागण्यामुळे फराहने वैतागून असंही ठरवलं होतं की, जर एखाद्या गाण्यात अक्षय खन्ना असेल तर ती त्या गाण्याची कोरिओग्राफी करणार नाही. ‘डोली सजा के रखना’ आणि ‘लावारिस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अक्षयसोबत काम केलं होतं. मात्र त्या अनुभवांनंतर तिचं मत काही काळासाठी नकारात्मक झालं होतं.

फराहने मात्र अक्षयबद्दल कायमचं मत बनवलं नाही. पुढे त्याच्या कामाच्या पद्धतीत झालेला बदल तिने स्वतः अनुभवला. 2001 मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटानंतर अक्षयच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचं फराहने सांगितलं. त्यानंतर त्याच्यासोबत काम करणं अधिक सहज झालं आणि त्याच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोनही बदलला. यानंतर फराह आणि अक्षय यांनी पुन्हा एकत्र काम केलं.

गेल्या काही काळात अक्षय खन्ना आपल्या अभिनयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः ‘धुरंधर’मधील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. या चित्रपटात त्याने रेहमान डकैतची भूमिका साकारली होती. या पॉडकास्टदरम्यान सीझरने फराहला विचारलं, “कोणत्या अभिनेत्यासाठी तुला सर्वांत जास्त मेहनत करावी लागली?” तेव्हा फराहने आधी त्याला स्वत:चं उत्तर देण्यासाठी सांगितलं. तेव्हा सीझरने अभिषेक बच्चनचं नाव घेतलं. त्यावर फराहने उत्तर दिलं की, “अभिषेक खूप चांगला डान्सर आहे.”

Follow Us
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?