
मुंबई : फरहान अख्तर याचा डॉन 3 (Don 3) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. डॉन 3 चित्रपटात शाहरूख खान दिसणार नसल्याने त्याच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला. मात्र, यावर स्पष्टपणे बोलताना नुकताच फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा दिसला आहे. शाहरूख खान याच्या अगोदर डाॅन चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन हे होते. त्यानंतर शाहरूख खान डाॅन 2 मध्ये दिसला. आता डाॅन 3 मध्ये रणवीर सिंह हा दिसणार असल्याचे स्पष्ट आहे. हे पुढे घेऊन जायचे असल्याचे सांगताना देखील फरहान अख्तर हा दिसला.
आता हे स्पष्ट झाले आहे की, डाॅन 3 मध्ये रणवीर सिंह हा दिसणार आहे. मात्र, आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे चित्रपटामध्ये कोण अभिनेत्री दिसणार? या चित्रपटासाठी सध्या बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिचे नाव जोरदार चर्चेत आहे. काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, कियारा अडवाणी हिला या चित्रपटाची आॅफर देण्यात आलीये.
कियारा अडवाणी ही डाॅन 3 मध्ये दिसणार असल्याचे जवळपास फायनल आहे, अशीही चर्चा आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना देखील फरहान अख्तर हा दिसला. फरहान अख्तर म्हणाला की, मी याबद्दल आताच जास्त काही बोलू शकत नाही. कारण मी आता एखाद्या नावाची घोषणा केली आणि ते नाव मला परत वापस घ्यावे लागले तर ते व्यवस्थित वाटणार नाही.
A New Era Begins #Don3 @RanveerOfficial #JasonWest @javedakhtarjadu @ritesh_sid @ShankarEhsanLoy @PushkarGayatri @j10kassim @roo_cha @vishalrr @excelmovies @rupinsuchak @chouhanmanoj82 pic.twitter.com/i1hHrl6fuo
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) August 9, 2023
यामुळे योग्य वेळी मी नक्कीच चित्रपटातील अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करेल. गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी हिचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने धमाका केला.
विशेष म्हणजे रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी हे स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. डाॅन 3 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहताना दिसत आहेत.