आग लागली, मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. कृपया मदत करा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या घराला लागली आग

मराठमोळ्या अभिनेत्याच्या बिल्डींगला आग लागली. त्यानंतर अभिनेता आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मदत मागितली होती. आता अभिनेत्याने घरातील व्हिडीओ शेअर केला आहे.

आग लागली, मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. कृपया मदत करा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या घराला लागली आग
Pushkar jog
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 25, 2025 | 1:54 PM

आज संपूर्ण देशात ख्रिसमस हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. अनेकजण घरात ख्रिसमस ट्री आणून ते सजवून आनंदाने सण साजरा करत आहेत. पण एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या आनंदावर विरझण फिरले आहे. अभिनेत्याच्या बिल्डींगला आग लागल्यामुळे तो आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे मदत मागितली होती. त्यानंतर अभिनेत्याला मदत मिळाली आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अभिनेत्याने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्याने मागितली मदत

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगच्या मुंबईत राहत असलेल्या बिल्डींगला आग लागली होती. त्याने आग लागल्यानंतर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला माझ्या बिल्डींगला आग लागली आहे. मी अडकलो आहे कृपया मदत करा. मी आणि माझी मुलगी आग लागल्यामुळे घरात अडकलो आहोत. सर्वत्र आग लागली आहे या आशयाची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Pushkar Jog

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

त्यानंतर पुष्करने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आग विझवल्यानंतर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पुष्करच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. बाल्कनीमध्ये सर्व आगीने काळे झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, आगीतून वाचवल्यामुळे रिअल फायर फायटरचे आभार मानले आहेत. तसेच मुंबई पोलिस आणि बीएमसीचे आभार मानले आहेत. माझे घर गेले असे देखील म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर पुष्कर जोगने घराला लागलेल्या आगीची व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर अभिनेत्री स्मिता गोंदकरने कमेंट करत बापरे हे कसं घडलं असा प्रश्न विचारला आहे. तर समीर गवळी, जिगनेश यांनी कमेंट करत पुष्कर जोगला काळजी घेण्यास सांगितले आहे. पण पुष्करच्या घराला आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेले नाही.