
Rebecca Baby : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून जगभरातील लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. फ्रान्सच्या ‘लूलू वॅन ट्रॅप’ या बँडची गायिका रेबेका बेबी ही हजारो माणसांपुढे निर्वस्त्र झाली आहे. तिच्या याच कृत्याची सगळीकडे चर्चा होत आहे. विशेष म्हणजे निर्वस्त्र होत तिने आपलं गाणं चालूच ठेवलं आहे. तिनं हे असं कृत्य नेमकं का केलं? असा प्रश्न विचारला जातोय. गाणं चालू असतानाच तिने या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलंय. लाईव्ह गाणं गात असताना टॉपलेस होणारी ही गायिका मूळची फ्रान्समधील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सचा लूलू वॅन ट्रॅप नावाचा एक प्रसिद्ध बँड आहे. या बँडचा शो पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होते. याच बँडमध्ये रेबेका बेबी नावाची प्रसिद्ध गायिका आहे. लाईव्ह परफॉर्मन्स चालू असतानाच ती हजारो लोकांपुढे निर्वस्त्र झाली आहे. या बँडतर्फे ‘Le Cri de la Goutte’ नावाच्या म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये लाईव्ह शो केला जात होता. याच शोदरम्यान लाईव्ह परफॉर्म करताना रेबेका बेबी या गायिकेने तिचा टॉप काढून टाकला. हे सगलं लाईव्ह शोदरम्यान घडून आलं. त्यामुळे तिच्या या कृत्याची सगळीकडेच चर्चा होत आहे. तिने हे कृत्य नेमके का केले? याचे कारणही समोर आले आहे.
रेबेका बेबीने टॉप काढल्याची ही घटना 26 जुलै रोजी घडली होती. त्या दिवशी रेबेका लाईव्ह गाणं गात होती. सर्व लोक तिच्या आवाजाने धुंद झाले होते. लोकांनाही या परफॉर्मन्समध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने तिने गाणे चालू असतानाच लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मात्र तिला फार वाईट अनुभव आला. प्रेक्षकांच्या गर्दीत जाताच दोन पुरुषांनी तिच्यासोबत वाईट कृत्य केले. एका पुरुषाने तिचा हात पकडला तर दुसऱ्या पुरूषाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर रेबेका चांगलीच घाबरली. स्टेजवर पुन्हा आल्यानंतर या गोष्टीचा निषेध म्हणून रागात तिने अंगावरचा टॉप काढून टाकला.
रागात अंगावरचा टॉप काढल्यानंतर तिने तिच्या भवना व्यक्त केल्या. महिलांच्या शरीराकडे चुकीच्या पद्धतीने पाहणे बंद करा, असं तिने आपल्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान सांगितलं. तिच्या या कृत्याचे अनेकजण समर्थन देत आहेत.