गुलशन कुमार हत्या ते टायगर श्रॉफवरील हल्ला : बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड संबंध किती जुने ?

टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुलशन कुमार, राकेश रोशन, सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कहाणी जाणून घ्या.

गुलशन कुमार हत्या ते टायगर श्रॉफवरील हल्ला : बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड संबंध किती जुने ?
under world and bollywood conection
| Updated on: Oct 20, 2026 | 12:07 AM

बॉलिवूडची झगमग, चमचमचे स्टार्स, कोट्यवधी रुपयांच्या बजेटचे चित्रपट आणि पडद्यामागील कथांनी प्रेक्षकांवर नेहमीच गारुढ घातले आहे. पण या चकचकीत जगाला एक काळी बाजूही आहे: अंडरवर्ल्डचा सहभाग, खंडणीच्या धमक्या आणि सेलिब्रिटींच्या हत्या. कधी चित्रपट पार्ट्यांमध्ये गुंडांच्या उपस्थिती, तर कधी चित्रपटाच्या अर्थसहाय्यावर आणि कलाकारांच्या निवडीवर दबाव आणल्याचे आरोप होत आले आहेत. काळ बदलला, कलाकार बदलले, पण बॉलिवूडला लक्ष्य केल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे: बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील संबंध नेमके किती जुने आहेत ?

हाजी मस्तान ते दाऊद इब्राहिम

मुंबईचे गुन्हेगारी जगत आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांच्यातील संबंध अनेक दशकांपासूनचे आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकात, हाजी मस्तानसारख्या गुन्हेगारांचे चित्रपट क्षेत्राशी संबंध होते चित्रपटसृष्टीतील त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरस कथा चर्चिल्या जातात. नंतरच्या काळात, दाऊद इब्राहिम आणि इतर गुन्हेगारी टोळ्यादेखील चित्रपटसृष्टीत दखल घेऊ लागल्या.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us