Akshay: हिरोची इमेज सोडून खलनायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार; ‘हैवान’च्या भूमिकेबद्दल केला मोठा खुलासा

Akshay Kumar : अक्षय कुमार आता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, 'हैवान' आणि 'गोलमाल 5' मध्ये तो प्रेक्षकांना धक्का देणार आहे. या चेंजबद्दल काय म्हणाला अभिनेता ?

Akshay: हिरोची इमेज सोडून खलनायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार; हैवान’च्या भूमिकेबद्दल केला मोठा खुलासा
AKSHAY KUMAR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 7:16 PM

Akshay Kumar Villain Roles : बॉलीवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमारचं लवकरच पुनरागमन होणार आहे. या वर्षी त्याचे २ चित्रपट रिलीज झाले आहेतच. आधी तो भूत ‘बंगला’ मध्ये दिसला, या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर शानदार कामगिरी केली. तर त्यानंतर त्याचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपटही रिलीज झाला. आता प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटातून अक्षय पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, त्यामध्ये तो खलनायकी भूमिका साकारणार आहे. एवञंच नव्हे तर तो अजय देवगणच्या ‘गोलमाल 5’ मध्येही झळकणार आहे. अक्षय कुमार याचा नुकताच बालड लूक समोर आला, लोकांना तो खूप आवडला. त्याच्या खलनायकी, निगेटीव्ह भूमिकेबद्दलही बरीच चर्चा होत असून त्यावर अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला असं वाटतं की एक अभिनेता म्हणून तुम्ही नेहमी प्रेक्षकांना आणि स्वत:लाही चकीत करत राहिलं पाहिजे ‘ असं तो म्हणाला.

सध्या अक्षय कुमार हिरोच्या आपल्या नेहमीच्या प्रतिमेपासून दूर जात आहे. आपल्या खलनायकाच्या भूमिकांबद्दल अभिनेत्याने नुकताच ‘व्हरायटी इंडिया’शी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “ माझा एका गोष्टीवर नेहमी विश्वास राहिला आहे की, अभिनेता म्हणून तुम्ही प्रेक्षकांना आणि त्याहूनही अधिक स्वतःला आश्चर्यचकित करत राहिले पाहिजे. ‘हैवान’मधील व्यक्तिरेखा पूर्णपणे वाईट आहे, त्यात कोणतीही ग्रे शेड नाही. तर ‘गोलमाल 5’ मध्ये मला अगदी वेगळ्या, विनोदी अंदाजात नकारात्मक पैलू साकारण्याची संधी मिळाली” असं त्याने नमूद केलं.

‘हैवान’मधील भूमिकेबद्दल काय सांगितलं ?

अलीकडेच अक्षय कुमारने सांगितलं की, ‘हैवान’मधील त्याची जी व्यक्तिरेखा आहे, ती त्याने आत्तापर्यंत आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने खलनायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळणे, हेच खूप रोमांचक आहे. माझ्यासाठी हा फरकच सर्वात रोमांचक आहे. खलनायक नेहमीच भयानक आणि गंभीर असण्याची गरज नाही. कधी कधी त्याच्या व्यक्तिरेखेत विनोद, वेडेपणा आणि अनपेक्षितपणाही असू शकतो, असं अक्षयने नमूद केलं.

चित्रपटांमध्ये हिरोऐवजी खलनायकाची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमार म्हणााला की, ‘इतकी वर्षं हिरोच्या भूमिका केल्यानंतर अशा प्रकारच्या शेड्स असलेल्या व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. कारण आता मी माझी हिरोची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत नाहीये’ असंही त्याने सांगितलं.

दरम्यान, प्रियदर्शन यांच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us