Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर! 

| Updated on: Mar 09, 2021 | 2:19 PM

निर्माते संजय लीला भन्साळी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याचबरोबर ते अभिनेत्री आलिया भट्टसोबत 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते.

Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, गंगूबाई काठियावाडी चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर! 
संजय लीला भन्साळी
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आजच (9 मार्च) समोर आली आहे. रणबीर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच चाहते खूप काळजीत आहेत. अशा परिस्थितीत रणबीर कोरोना पॉझिटिव्ह असण्याच्या बातमीला काही वेळ उलटताच आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळींना देखील कोरोनाची लागण (Sanjay Leela Bhansali tested corona positive) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नुकतीच ज्येष्ठ चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची बातमी मिळाली आहे (Gangubai Kathiawadi producer Sanjay Leela Bhansali tested corona positive).

निर्माते संजय लीला भन्साळी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याचबरोबर ते अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. या चित्रपटाचे चित्रीकरण शूटिंग सध्या फास्ट मोडवर सुरु होते. पण आता चित्रपट निर्मात्याला कोरोना झाल्याने या चित्रीकरणाला देखील ब्रेक लागला आहे.

संजय लीला भन्साळी क्वारंटाईन

बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली, तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे चित्रपटाचे चित्रीकरणही बंद करण्यात आले आहे. तसेच, संजय लीला भन्साळी याक्षणी क्वारंटाईन झाले आहेत. आता निर्मात्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, या चित्रपटाशी संबंधित इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वादात ‘गंगूबाई…’

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सतत नवनव्या अडचणींमध्ये अडकत आहे. पूर्वी चित्रपटाला विरोध केला जात होता आणि आता त्याचे नाव बदलण्याची मागणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की, या नावामुळे काठियावाड शहराची प्रतिमा कलंकित होईल (Gangubai Kathiawadi producer Sanjay Leela Bhansali tested corona positive).

आमदार अमीन पटेल विधानसभेत म्हणाले की, काठियावाद हे आता 50च्या दशकासारखे राहिले नाहीत. तेथील महिला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच पुढे गेल्या आहेत. या चित्रपटाचे नाव बदलले पाहिजे. यासह राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी देखी त्यांनी केली आहे.

कामाठीपुराच्या रहिवाशांची निदर्शने

अलीकडेच कामठीपुरा येथील लोकांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाविरोधात मुंबईत निदर्शने केली, यातील लोकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कामठीपुरा हा मुंबईतील रेड लाईट एरिया आहे. परंतु, आता तेथील तरुण मंडळी या जागेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून या चित्रपटामधून आपली राहती जागा अतिशय चुकीची दाखवली जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कामठीपुरा येथील निषेध करणारे युवा नेते म्हणाले, ‘आमच्या भागाला सामान्य कॉलनीचा दर्जा का मिळत नाही. कामठीपुराची आता चांगली प्रतिमा दाखवण्याची गरज आहे.’ एका वृत्तानुसार, ब्रिटीशांनी आपल्या रेड लाईटचे क्षेत्र आपल्या सैनिकांसाठी ‘कम्फर्ट झोन’ म्हणून तयार केले होते. परंतु, नंतर हा भाग संपूर्ण बदलला.

आलियाचं कौतुक!

चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई कठियावाडी’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये चाहत्यांना आलिया भट्टच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली भूमिका पाहायला मिळाली आहे. 1 मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये अशी छाप उमटते की, पाहणारा प्रत्येकजण आलियाची प्रशंसा करू लागतो.

(Gangubai Kathiawadi producer Sanjay Leela Bhansali tested corona positive)

हेही वाचा :

Vidya Balan | ‘बॉडी शेमिंग’मुळे त्रस्त आहात?, मग विद्या बालनने दिलेलं ‘हे’ उत्तर ऐकाच!