बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी; मिरवणुकांमध्ये 20 वर्षांनंतरही वाजतं हे गाणं, सुपरस्टारनं केलाय अभिनय

गणपती बाप्पाला 10 दिवसांनंतर निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत अनेक गाणी वाजत असताना हे एक गाणंही आवर्जून लावलं जातं.

बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी; मिरवणुकांमध्ये 20 वर्षांनंतरही वाजतं हे गाणं, सुपरस्टारनं केलाय अभिनय
Morya Re Shah Rukh Khan
Image Credit source: social media
| Updated on: Sep 25, 2026 | 6:53 PM

आज बाप्पाला दहा दिवसांनंतर सर्वत्र निरोप दिला जात आहे. सगळे भावुक झाले आहेत. बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत आहेत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, असा जयघोष सुरु आहे. बाप्पाला निरोप देताना अनेक गाणी वाजत आहेत, त्यातच हे एक जुनं गाणं आहे जे नेहमी वाजतं. या गाण्यात ढोल-ताशांच्या गजरात शाहरुख खानचा धमाकेदार डान्स पाहायला मिळाला होता. तर शंकर महादेवन यांच्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. जवळपास २० वर्षांनंतरही बाप्पाच्या विसर्जनावेळी हे गाणं सर्वत्र आवर्जून ऐकायला मिळतं.

शाहरुख खानचं बाप्पावरील गाणं

हे गाणं आहे २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘मोरया रे’ या गाण्याबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले होते, तर या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले होते. या गाण्यात बाप्पाच्या विसर्जनाची भव्य झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मनसोक्त डान्स करताना दिसला होता. या गाण्यातून बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आमंत्रण अतिशय सुंदररित्या देण्यात आलं आहे.

गाण्याचे खास बोल

मेरे सारे पलछिन सारे दिन
तरसेंगे सुन ले तेरे बिन
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा
अगले बरस आना है आना ही होगा
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा
अगले बरस आना है आना ही होगा
देखेंगी तेरी राहें, प्यासी प्यासी निगाहें
तो मान ले तू मान भी ले कहना मेरा
लौट के तुझको आना है
सुन ले कहता दीवाना है
जब तेरा दरसन पाएंगे
चैन तब हमको पाना है

‘डॉन’ चित्रपटाबद्दल

१९७८ मध्ये ‘डॉन’ हा चित्रपट याच नावाने आला होता, त्यानंतर २००६ मध्ये त्याच नावाने पुन्हा ‘डॉन’ बनवण्यात आला. यामध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, अर्जुन रामपाल, ईशा कोप्पीकर, बोमन इराणी, पवन मल्होत्रा आणि ओम पुरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या अल्बममध्ये एकूण ८ गाणी होती, ज्यामध्ये ३ मूळ गाणी, जुन्या चित्रपटातील दोन गाण्यांचे रिमेक, एक थीम साँग, एक रिप्राईज आणि ३ गाण्यांच्या रिमिक्सचा समावेश होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us