कैदी नंबर 343 ला घेऊन या…, तुरुंगात सलमान खानची अशी अवस्था पाहून आई – वडिलांना बसलेला मोठा धक्का

Happy Birthday Salman Khan : वाढलेली दाढी... डोळ्याखाली काळे डाग आहे.... 'कैदी नंबर 343 ला घेऊन या..' हे शब्द ऐकल्यानंतर चाहत्यांना बसलेला मोठा धक्का..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याचीच चर्चा...

कैदी नंबर 343 ला घेऊन या..., तुरुंगात सलमान खानची अशी अवस्था पाहून आई - वडिलांना बसलेला मोठा धक्का
अभिनेता सलमान खान
| Updated on: Dec 27, 2025 | 10:07 AM

Happy Birthday Salman Khan : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त कारणांमुळे अधिक चर्चेत होता… एके काळी काळवीट शिकार केल्याबद्दल न्यायालयाने त्याला जोधपूर तुरुंगात पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. निकाल ऐकताच, अभिनेता निराश झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. तेव्हा त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या बहिणींना त्याने घट्ट मिठी मारली आणि तुरुंगात गेला..

जोधपूरमध्ये सलमान खान याला केवळ काळवीट मारल्याबद्दलच नव्हे तर हिट-अँड-रन प्रकरणातही तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्याला कोणत्याही व्हीआयपी वागणूकीशिवाय सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक देण्यात आली. एका सेलिब्रिटीच्या मुलाला आणि फिल्मी स्टारला कोणत्याच सुविधांशिवाय तुरुंगात राहणं प्रचंड कठीण होतं. एकदा सलमान खान याला भेटण्यासाठी त्याचे आई – वडील तुरुंगात आले होते.

आई वडीलांसमोर पोलीस म्हणाले, ‘कैदी नंबर 343 ला घेऊन या…’ हे ऐकताच भाईजानच्या आई – वडिलांना मोठा धक्का बसला… ज्या मुलाला मोठ्या लाडाने वाढवलं आहे, त्याची ओळख आता फक्त कैदी नंबर 343 अशी राहिली होती… सलमानला त्याच्या आई – वडिलांसमोर आणताच, अभिनेत्याचा फिकट चेहरा, वाढलेली दाढी आणि डोळ्यांखाली पडलेले काळे डाग पाहून ते रडू लागले.

निलेश मिश्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान तेव्हाची परिस्थिती सांगितली होती.. ‘जेव्हा मी पाणी प्यायचो, तेव्हा सतत एकच चिंता सतावत असायची माझ्या मुलाने काही खाल्ल आहे की नाही… याच विचाराने मी कधी घरातला एसी देखील लावला नव्हता कारण माझा मुलगा गरमीमध्ये चटईरवर झोपला आहे…’ असं देखील सलीम खान म्हणाले होते.

तुरुंगातून परतल्यानंतर सलमान खानमध्ये लक्षणीय बदल दिसून आले . तो आता वाद वादग्रस्त प्रकरणांपासून दूर असतो. सलमान खान आता पूर्वीपेक्षा अधिक शिस्तबद्ध, आध्यात्मिक आणि कुटुंबाभिमुख दिसतो. असं असताना  देखील सलमान खान याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  अभिनेत्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत. एवढंच नाही तर, सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.