‘अनेक लोकं माझ्यावर प्रेम करत असतील तर…’, प्रेमात देवदास झालेल्या अभिनेत्याबद्दल हेमा मालिनी यांचं वक्तव्य

Hema Malini Love Life | फक्त धर्मेंद्रच नाही तर, 'हा' अभिनेता हेमा मालिनी यांच्यावर जीवापाड प्रेम करायचा, नकार मिळाल्यानंतर सतत असायचा नशेत, अनेक वर्षांनंतर हेमा मालिनी म्हणाल्या, 'अनेक लोकं माझ्यावर प्रेम करत असतील तर...', सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा...

अनेक लोकं माझ्यावर प्रेम करत असतील तर..., प्रेमात देवदास झालेल्या अभिनेत्याबद्दल हेमा मालिनी यांचं वक्तव्य
| Updated on: Jun 18, 2024 | 12:44 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे हेमा मालिनी अधिक चर्चेत असतात. करियरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्याशिवाय हेमा मालिनी यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी होती.

हेमा मालिनी यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत जितेंद्र आणि दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचं नाव देखील होतं. संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल देखील तुफान चर्चा रंगली होती. एका मुलाखतीत हेमा यांना संजीव यांच्याबद्दल विचारण्यात देखील आलं होतं.

 

 

हेमा मालिनी यांना विचारलं, ‘संजीव कुमार यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायला आवडेल. संजीव यांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम होतं. तुमच्या प्रेमात संजीव देवदास झाले होते. प्रचंड दारू प्यायला लागले होते…’ यावर हेमा मालिनी यांनी दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, ‘चांगली गोष्ट आहे… प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करत आहे. यावर आनंद वाटायला हवा. अनेक लोकं एकाच व्यक्तीवर प्रेम करतात…’ यावर मुलाखतीत उपस्थित असलेली ईशा देओल देखील हसू लागली. हेमा मालिनी यांनी विनोदी अंदाजात उत्तर दिलं होतं.

 

 

मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल देखील विचारण्यात आलं होतं. ‘धर्मेंद्र यांनी देखील तुम्ही सुरुवातील अधिक महत्त्व देत नव्हत्या…’ यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र माझ्यासाठी कायम स्पेशल आहेत आणि राहातील…’ सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहे. पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. हेमा मालिनी – धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. तर प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत.