Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश

सनी देओलचा 'बटवारा 1947' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटातील माणुसकी, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश अनेकांना भावला आहे. खासदार हेमा मालिनींनीही या चित्रपटाचं 'अत्यंत उत्कृष्ट' म्हणत कौतुक केलं. त्यांनी सनी देओलच्या अभिनयाची प्रशंसा करत सामाजिक सलोख्याची गरज अधोरेखित केली. हा चित्रपट द्वेषापेक्षा प्रेमाची निवड करण्यास शिकवतो, असं त्या म्हणाल्या.

Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश
हेमा मालिनी यांना कसा वाटला सनी देओलचा चित्रपट ?
| Updated on: Aug 17, 2026 | 8:17 PM

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा बहुचर्चित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला असून त्याचं खूप कौतुकही केलं जात आहे. 14 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या चित्रपटात माणूसकी, प्रेम आणि धार्मिक सीमांच्या पलीकडे जाणारा परस्पर बंधुभावाचा संदेश देण्यात आला असून आहे. अभिनेत्री , खासदार हेमामालिनी (Hema Malini)  यांनीही नुकताच हा चित्रपट पाहिला असून त्यांनी सनी देओलच्या पिक्चरचं भरभरून कौतुक केलं आहे. पिक्चरमधून देण्यात आलेल्या मेसेजबद्दलही त्या बोलल्या.

हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरून आपली प्रतिक्रि दिली. या चित्रपटाला “अत्यंत उत्कृष्ट” (simply brilliant) असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. हा चित्रपट लोकांना द्वेष आणि विभाजनापेक्षा माणुसकी व प्रेमाची निवड करण्यास शिकवतो, असं त्यांनी म्हटलं. हा चित्रपट पाहून लोकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल आणि ते एकमेकांशी आणखी दयाळूपणे वागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेमा मालिनी यांना कसा वाटला चित्रपट ?

मी हा चित्रपट एक दिवस आधी पाहिला आणि मला तो खूपच प्रभावी वाटला, असं त्यांनी लिहीलं. ‘बटवारा 1947’ हा केवळ 1947 साली झालेल्या फाळणीची कथा सांगत नाही, तर आजच्या समाजासाठीही हा चित्रपट एक महत्त्वाचा संदेश देतो, असं त्यांनी नमूद केलं. देशाला सध्या माणुसकी, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोख्याची गरज असल्याचंही हेमा मालिनी यांनी लिहीलं.

 

सनी देओल, शबाना आझमी यांच्या अभिनयाचे कौतुक

हेमा मालिनी यांनी चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक केलं. त्यांनी विशेषतः सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाची खूपच प्रशंसा केली. याशिवाय करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्याचे हेमामालिनी यांनी पोस्टमध्ये आवर्जून म्हटलं. एवढ्या छान चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याबद्दल त्यांनी राजकुमार संतोषी यांचंही अभिनंदन केलं. तसंचआजच्या काळात गरजेचा असलेला सामाजिक संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल त्यांनी निर्माता आमिर खान यांचंही कौतुक केलं.

फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे कथा

‘बटवारा 1947’ची कथा फाळणीच्या काळावर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल, शबाना आझमी, करण देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत अली फजल, अभिमन्यू सिंह, खुशी हजारे, कनिका कपूर, वसीम राजपूत आणि ईशा संधीर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. असगर वजाहत यांच्या प्रसिद्ध नाटक ‘जिस लाहौर नई वेख्या, ओ जम्या ई नई’ यापासून हा चित्रपट प्रेरित असल्याचेंसांगितले जाते. 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. फाळणीच्या काळातील मानवी नाती, संघर्ष आणि माणुसकी यांची मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us