AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : पुढचे 3 दिवस या भागात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अंदाज सांगितला; तुमच्या भागात काय होणार?

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील पावसाचा नवा अंदाज दिला आहे. 17-19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात विखुरलेला, तर विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस कधी पडेल हेही त्यांनी सांगितलं आहे.

Rain Update : पुढचे 3 दिवस या भागात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अंदाज सांगितला; तुमच्या भागात काय होणार?
Rain updates
| Updated on: Aug 17, 2026 | 10:11 PM
Share

राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, मात्र काही ठिकाणी वरूणराजाने उघडीप दिली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं खरं, तर काही भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अशातच आता येत्या काळात, राज्यात पावसाची स्थिती कशी असेल, कुठे कसा पाऊस पडेल, याबद्दल प्रश्न मनात असून पावसाबद्दल विचारणा होत आहे. याचसंदर्भात आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पावसाबद्दलचा नवा अंदाज समोर आला आहे. 17, 18 , 19 ऑगस्ट, आणखी 3 दिवस राज्यात मराठवाड्यात,परभणी, लातूर, धाराशिव येथे विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती या परिसरात जोराचा पाऊस होईल, असं डख यांनी सांगितलं.

चांगला पाऊस कधी ?

येत्या काही दिवसत तुरळक असा पाऊस पडेल. मात्र चांगला पाऊस कधी पडेल याबद्दलही पंजाबराव डख स्पष्टपणे बोलले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, साधारण 5 सप्टेंबर नंतर शेतातूनसुद्धा पाणी वाहील असा पाऊस पडणार आहे, तेव्हा मोठा पाऊस पडणार असल्याचं ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुणे जिल्हा, कोकणपट्टीत तिथे दुपारनंतर जोराचा पाऊस पडू शकतो, असं डख म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नव्हे, पण वेगवेगळ्या भागात 18 तारखेरपर्यंत विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. श्रीगोंदा, कर्जत जामखेड, अहिल्यानगर, बारामती या बऱ्याच भगांमध्ये या तीन दिवसांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच पुण्यातही चांगला पाऊस होईल, याची नोंद घ्यावी असं डख यांनी नमूद केलं.

संगमनेर , अकोल्याच्या परिसरात देखील पाऊस तिथे सतत सुरू राहणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सरीवर सरी चालूच राहणार आहे. जळगाव, नंदूरबार, धुळे, या पट्ट्यामध्ये 18 तारखेपर्यंत आणि शेवटच्या आठवड्यातही पाऊस असेल असं डख यांनी म्हटलं.

कुठे होणार जोरदार मुसळधार पाऊस ?

काही भागात खूप मोठा पाऊस नाही पण पिकाला लागेल असाच पाऊस पडणार आहे. फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोल्यात जोरदार मुसळधार पाऊस होईल असं डख यांनी सांगितलं. कोल्हापूरला जोरदार पाऊस होऊ शकतो, साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जास्त जोर असेल, असं त्यांनी सांगितलं. कोकणपट्ट्यात रत्नागिरी पासून पालघर पर्यंत जोरदार पाऊस असेल. 7 ते 8 जिल्ह्यांत मोठा पाऊस होईल, मात्र उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात सगळीकडे चांगल्या पावसासाठी ऑगस्टचा शेवट, सप्टेंबरच उजाडेल असं डख यांनी म्हटलं.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात