AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मुंबई जाम मग…मनोज जरांगेचा मराठा समाजाला संदेश, अंतरवाली सराटीत जमा होण्याचे आवाहन!

जरांगे यांना त्यांच्या आंदोलनात सहकार्य म्हणून अनेकजण आर्थिक मदत करतात. त्यांनाही जरांगे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. छत्र, जेवण, पाणी द्यायचं आहे त्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर द्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

आधी मुंबई जाम मग...मनोज जरांगेचा मराठा समाजाला संदेश, अंतरवाली सराटीत जमा होण्याचे आवाहन!
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 9:42 PM
Share

Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरागे सध्या पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनासाठी त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. सोबतच आता मी माघार घेणार नाही, सगळ्या मागण्या मान्य करूनच घेणार, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधी मुंबई जाम, मग काम तरच मराट्याला देशात मान असं म्हणत 29 ऑगस्टच्या लढाईत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे जरांगे म्हणाले आहेत.

आधी मुंबई जाम मग काम तरच मराठ्याला देशात मान आहे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील मराठा आता खवळून उठाला आहे. 29 आँगस्टच्या लढाईत सगळ्या मराठ्यांनी सहभागी व्हायचं आहे. मी तीन वर्ष सरकारवर विश्वास ठेवला. आता फक्त हैदराबाद गँझेटीयरच्या अनुसार सर्व प्रमाणपत्रं दिली तर व्हँलिडीटी कशी देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्या

सातारा गँझेटीयरची अमलबंजावणी झाली का? आता सर्व अमलबंजावणी आपल्याला जागेवर पाहिजे. अमलबंजावणी करण्यासाठीच सरकारच्या व्यक्तींनी आमच्याकडे यायचं आहे, असं त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं. तसेच सगळ्यांनी अंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचे असल्याचेही आवाहन त्यांनी केले.

या लढाईत निर्णायक आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा

जरांगे यांना त्यांच्या आंदोलनात सहकार्य म्हणून अनेकजण आर्थिक मदत करतात. त्यांनाही जरांगे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. छत्र, जेवण, पाणी द्यायचं आहे त्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर द्या. जी काही मदत करायची आहे ती आंदोलनस्थळी येऊ द्या. कोणाला पैसे दिल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही जरांगे यांनी सांगितले. या लढाईत निर्णायक आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या मुलींवर केलेल्या भाष्यावरही जरांगे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. अगोदर इज्जत घालवायची आणि मग माफी मागायची. आम्ही लेकी बाळीला कधी दुखावलेले नाही, असे म्हणत जरांगे यांनी वाघमारे यांना सुनावले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात