AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Accounts : तुमचे एक पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील, तर हे नक्की करा…नाहीतर होईल मोठी अडचण!

सामान्यत: नोकऱ्या बदलताना किंवा इतर काही कारणास्तव आपल्यापैकी अनेकजण बँकेत नवीन खाते उघडत असतो. मात्र अशावेळेस आपले आधीच्या जुन्या खात्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतोय की खाते इनॲक्टिव्ह आहे की नाही हे कसे ठरवावे किंवा इनॲक्टिव्ह खाते पुन्हा ॲक्टिव्ह कसे करावे? तर आपण आजच्या लेखात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Bank Accounts : तुमचे एक पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील, तर हे नक्की करा...नाहीतर होईल मोठी अडचण!
bank accountsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 27, 2026 | 3:35 PM
Share

Bank Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे. कारण डिजिटल युगात बँकेत खाते असणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे व्यवहार हा सुरक्षित होतो. अशातच आपल्यापैकी काही नोकरदार लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यामुळे ते अनेकदा त्यांची जुनी बँक खाती विसरून जातात. त्यामुळे जर तुमचे जुने बँक खाते असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शिवाय जर जुन्या खात्यात बऱ्याच‍ म‍हिन्यांपासून किंवा वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल तर ते खाते निष्क्रिय होते. आता अनेक लोकांना प्रश्न पडतो की एखादे खाते निष्क्रिय आहे की नाही हे कसे समजावे किंवा निष्क्रिय खाते कसे सक्रिय करावे या संभ्रमात असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

बँक खाते कधी निष्क्रिय होते?

आरबीआयच्या नियमांनुसार, जर खातेधारकाने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ बँक खात्यात कोणताही व्यवहार झाला नसेल, तर तुमचे खाते निष्क्रिय असू शकते. खात्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जुन्या आणि निष्क्रिय झालेल्या खात्यांची सुरक्षा राखणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे जर तुम्ही बचत खाते, पगार खाते किंवा इतर कोणतेही बँक खाते अनेक वर्षांपासून वापरले नसेल तर त्याची स्थिती नक्की तपासा.

निष्क्रिय खात्यात ठेवलेल्या पैशांचे काय होते?.

निष्क्रिय खात्यात तुम्ही जमा केलेली रक्कम तुमच्या खात्यातच राहते, परंतु ते खाते सक्रिय केल्याशिवाय तुम्ही ती काढू शकत नाही. जर तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले असेल, तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

निष्क्रिय खाते कसे सक्रिय करावे?

निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमची बँक तुम्हाला केवायसी करून घ्यावे लागेल. नंतर तुमचे खाते सक्रिय केले जाईल. केवायसीसाठी सामान्यतः ओळख आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. बँकेच्या नियमांनुसार, केवायसी अपडेट्स शाखेत प्रत्यक्ष जाऊन किंवा उपलब्ध असल्यास व्हिडिओ केवायसीद्वारे पूर्ण केले जाऊ शकतात.

तुमच्या जवळच्या बँक शाखेला भेट द्या

बँकेच्या अधिकाऱ्याशी बोलून खाते सक्रिय करण्याची प्रक्रिया समजून घ्या.

आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळवा आणि ती सादर करा.

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे खाते सक्रिय केले जाईल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात