लघवी प्यायला दिली नाही म्हणून…, ट्रोलर्सवर का भडकले परेश रावल?

Paresh Rawal: प्रकृती सुधारण्यासाठी लघवी प्यायलो... या वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या परेश रावल यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, लघवी प्यायला दिली नाही म्हणून...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परेश रावल यांचीच चर्चा...

लघवी प्यायला दिली नाही म्हणून..., ट्रोलर्सवर का भडकले परेश रावल?
फाईल फोटो
| Updated on: Jul 22, 2025 | 8:40 AM

Paresh Rawal: काही दिवसांपूर्वी अभिनेते परेश रावल यांनी मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. गुडघ्यांना झालेली दुखापत बरी करण्यासाठी रोज सकाळी स्वतःची लघवी प्यायलो, ज्यामुळे एका महिन्यात माझी प्रकृती सुधारली… असं वक्तव्य परेश रावल यांनी केलं होतं. ज्यामुळे परेश यांना अनेकांनी ट्रोल देखील केलं. होत अलेल्या ट्रोलींगवर परेश रावल यांनी अखेर सडेतोड उत्तर दिलं आहे. …’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परेश रावल यांचीच चर्चा होत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, ‘मी त्यांनी लघवी दिली नाही म्हणून ते नाराज आहेत? त्यांना असं वाटत आहे की, मी एकट्याने लघवी प्यायली आणि आम्हाला नाही दिली? ती माझ्या आयुष्यातील एक घटना आहे जी 40 वर्षांपूर्वी घडली आहे. ती घटना मी सांगितली… त्यामध्ये चूक असं काय आहे? लोकांना राईचा पर्वत करायला फार आनंद मिळतो. त्यांनी आनंद होत असेल तर ठिके…’ असं देखील परेश रावल म्हणाले.

काय म्हणाले होते परेश रावल

‘घायल’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, परेश रावल यांना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा विरू देवगन त्यांची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा विरु देवगन यांनी परेश यांनी सकाळी लघवी पिण्याचा सल्ला दिला.

यावर परेश रावल म्हणाले, ‘देवगन सरांनी दिलेला सल्ला मी ऐकला. मी लघवी बियर समजून प्यायलो. कारण मला याचं पालन करायचं होतं. तर मी ठरवलं योग्य पद्धतीत करायचं. 15 दिवस मला सकाळी लघवी प्यायची होती. त्यानंतर प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टर देखील चकित झाले होते…’ सध्या सर्वत्र परेश रावल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

परेश रावल यांचे सिनेमे

परेश रावल स्टारर ‘निकिता रॉय’ यांचा सिनेमा प्रदर्शित झाला. परेश रावल ‘भूत बंगला’ आणि ‘हेरा फेरी 3’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. चाहते देखील त्यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. परेश रावल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.