अभिषेक बच्चनने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना केलंय डेट, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क
Abhishak Bachchan Love Life: फक्त निम्रित कैर आणि करिश्मा कपूर नाही तर, लग्नाआधी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट करत होता अभिषेक बच्चन तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क..., सध्या सर्वत्र चर्चांना उधाण

Abhishak Bachchan Love Life: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अभिषेक बच्चन नव्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. तर अभिषेक फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधीक चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही… असं स्पष्टीकरण अभिनेत्याने दिलं आहे. तर ऐश्वर्याने मात्र यावर मौन बाळगणं पसंत केलं आहे. 2011 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. पण त्याआधी अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. एकीसोबत तर अभिनेत्याचा साखरपुडा देखील मोडला.
दीपानिता शर्मा : आधी मॉडेल आणि त्यानंतर अभिनेत्री झालेली दीपानिता शर्मा बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकली नाही. पण एककाळ असा होता जेव्हा पूर्ण बॉलिवूडमध्ये दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दीपानिताची अभिषेक बच्चनशी ओळख करून दिल्याचं सांगितलं जातं. दोघांनी जवळजवळ 10 महिने एकमेकांना डेट केलं. अभिषेकला त्यांचं नातं कोणाला कळू द्यायचं नव्हचं म्हणून ते वेगळे झाले.
अभिनेत्री करिश्मा कपूर : करिश्मा आणि अभिषेक यांची ओळख बहीण श्वेता बच्चन हिच्या लग्नात झाली. जवळसाप 5 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबाची भावी सून… म्हणून देखील जया बच्चन यांनी करिश्माची ओळख करुन दिली होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांचा साखरपुडा मोडला.
राणी मुखर्जी : राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. बच्चन कुटुंबियांसोबत देखील ऐश्वर्याचे चांगले संबंध होते. राणी बच्चन कुटुंबियांची सून होईल असं देखील सर्वांना वाटलं. पण अभिषेक याने ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न केलं आणि सर्वांना धक्का बसला.
निम्रत कौर : ऐश्वर्या बच्चन हिच्यासोबत घटस्फोटाच्या रंगलेल्या असताना अभिषेक याचंन नाव निम्रत कौर याच्यासोबत जोडण्यात आलं. सिनेमा दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे. अभिषेक बच्चनने या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगलं आहे, तर निम्रत कौरने दिलेल्या मुलाखतीत यावर म्हणाली, मी काहीही करू शकली असती आणि लोक अजूनही त्यांना जे हवे ते म्हणतील. पण अशा चर्चा थांबवणं कठीण आहे.
