33 वर्षांपूर्वी ‘श्री कृष्ण’ मालिकेत झळकलेली ‘ही’ अभिनेत्री हिमेश रेशमियाची दुसरी बायको; मैत्रिणीचा संसार मोडला अन्…

Himesh Reshammiya : अभिनेता हिमेश रेशमिया याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. सध्या गायकाच्या दुसऱ्या बायकोची चर्चा रंगली आहे. जी 33 वर्षांपूर्वी 'श्री कृष्ण' मालिकेत झळकली होती.

33 वर्षांपूर्वी श्री कृष्ण मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री हिमेश रेशमियाची दुसरी बायको; मैत्रिणीचा संसार मोडला अन्...
Himesh Reshammiya
| Updated on: Nov 25, 2026 | 1:16 PM

Himesh Reshammiya : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया याने अनेक गाण्यांना आवाज देत सर्वांना त्याच्या तालावर थिरकायला लावलं. आज गायकाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या खासगी आयु्ष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. सध्या सर्वत्र हिमेश याच्या दुसऱ्या बायकोच्या चर्चांनी जोर धरला आहे. आज हिमेश याची दुसरी बायको झमगमत्या विश्वात सक्रिय नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा गायकाची दुसरी बायको टीव्ही विश्वात सक्रिय होती. ज्या मालिकेत हिमेश याची दुसरी बायको झळकलेली, त्या मालिकेचं नाव ‘श्री कृष्ण’ होतं. मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती.

मालिकेत ‘श्री कृष्ण’ची बहीण सुभद्रा हिची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, हिमेश याची दुसरी बायको होती. हिमेश याच्या दुसऱ्या बायकोचं नाव सोनिया कपूर आहे. मालिकेतील तिची भूमिका फार मोठी नव्हती, पण अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिची भूमिका या मालिकेत अवघ्या तीनच एपिसोड्सपुरती मर्यादित होती, तरीही आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Loading...

सांगायचं झालं तर, सोनिया कपूर हिने फक्त ‘श्री कृष्ण’ मालिकेतच नाही तर, इतर मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आणि स्वतःची ओळख निर्माण केली. फक्त मालिकाच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सोनिया तिच्या खासगी आयुष्यमुळे देखील चर्चेत राहिली. अभिनय विश्वात करियर घडवत असताना सोनिया आणि हिमेश यांची ओळख झाली, त्यानंतर ओखळीचं प्रेमात रुपांतर झालं. पण तेव्हा गायक विवाहित होता. एवंढच नाही तर, हिमेश, सोनियाच्या खास मैत्रिणीचा नवरा होता.

सोनिया आणि हिमेश यांनी एकमेकांना जवळपास 10 वर्ष डेट केलं. त्यानंतर हिनेश याने पहिल्या बायकोला घटस्फोट दिला आणि सोनिया हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. हिमेश कायम सोनिया हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us