लग्नाच्या 2 महिन्यांतच सासूकडून हिना खानची पोलखोल; म्हणाली ‘हिचे नखरे खूप’

रॉकी जयस्वालची आई म्हणजेच हिना खानची सासू या शोमध्ये तिच्याविषयी बरेच खुलासे करणार आहे. शोचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हिनाचे खूप नखरे आहेत, तिच्याशी पंगा कोण घेणार, असं तिची सासू म्हणाली.

लग्नाच्या 2 महिन्यांतच सासूकडून हिना खानची पोलखोल; म्हणाली हिचे नखरे खूप
हिना खान आणि तिची सासू
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 29, 2025 | 7:58 PM

टेलिव्हिजनवरील ‘पती पत्नी और पंगा’ हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजतोय. यामध्ये सेलिब्रिटी जोडपे सहभागी झाले असून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी समोर येत आहेत. या शोमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या पतीसोबत सहभागी झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये हिनाच्या सासूने तिच्याविषयी जे खुलासे केले, ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लग्नानंतर त्या कशाप्रकारे सुनेचे नखरे झेलत आहेत, याचा खुलासा त्यांनी केला. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिनाचे घरात किती नखरे असतात, याविषयी त्या प्रोमोमध्ये सांगताना दिसत आहेत.

या वीकेंडला ‘पती पत्नी और पंगा’ हा शो आणखी जबरदस्त होणार आहे. कारण त्यामध्ये सेलिब्रिटींच्या सासू सहभागी होणार आहेत. सून आणि मुलाची पोलखोल करण्यासाठीच त्यांना शोमध्ये आमंत्रित केलंय. हिनाची सासू म्हणते, “ती डायनिंग टेबलवर बसते आणि तिला मसाल्यांबद्दल काहीच माहीत नसतं. परंतु मी एखादा पदार्थ बनवल्यास म्हणते की, यात काहीतरी कमी आहे. यात हे कमी आहे, ते जास्त आहे, अशा तक्रारी करते.” हे ऐकल्यानंतर हिनाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसतात. त्यावर सूत्रसंचालक मुनव्वर म्हणतो की, “येत तर काही नाही, पण नखरे खूप आहेत.” त्यावर हिनाची सासू आणखी डिवचते की, “नखरे तर खूप आहेत.”

शोमधील इतर स्पर्धकसुद्धा हिनाची मस्करी करू पाहतात. अभिनेत्री अविका कौर त्यांना मस्करीत म्हणते, “तुम्हा सासू आहात सासू.” हे ऐकल्यानंतर हिनाची सासू म्हणते, “हो पण तिच्याशी कोण पंगा घेणार?” त्यावर हिनाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे असतात. सोशल मीडियावर हिना आणि तिच्या सासूचा हा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रोमोवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हिनावर टिका केली, तर काहींनी हिनाच्या सासूची तुलना अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सासूशी केली. ‘हा शो खरा फॅमिली ड्रामा आहे, मजा येतेय’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलंय. हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलं.