AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर हिना खानने स्वीकारला सनातन धर्म? अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलंय. या दोघांच्या आंतरधर्मीय लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता लग्नानंतर हिनाने सनातन धर्म स्वीकारल्याचं एका अभिनेत्याने म्हटलंय.

लग्नानंतर हिना खानने स्वीकारला सनातन धर्म? अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा
रॉकी जयस्वाल, हिना खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2025 | 3:53 PM
Share

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी नुकतंच लग्न केलंय. या दोघांचा हा आंतरधर्मीय विवाह आहे. कारण हिना मुस्लीम आहे तर रॉकी हिंदू आहे. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर हिनाने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. त्यावर नेटकऱ्यांनी आणि विविध सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता एका अभिनेत्याने हिना आणि रॉकीचा फोटो शेअर करत तिने लग्नानंतर सनातन धर्म स्वीकारल्याचं म्हटलंय.

अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरकेनं हिनाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये हिना आणि रॉकी यांच्या कपाळावर टिळा पहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत केआरकेनं लिहिलं, ‘हिना खानला सनातन धर्म स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा.’ त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून हिनाने लग्नानंतर खरंच धर्मांतर केलं का, असा सवाल अनेकजण विचारत आहेत. केआरकेनं नेमक्या कोणत्या उद्धेशाने ही पोस्ट लिहिली, हे अस्पष्टच आहे. तरी याआधीही हिनाला मंदिरात जाताना आणि देवाचं दर्शन घेताना पाहिलं गेलंय. लग्नापूर्वीच हिना आणि रॉकी बंगळुरूमध्ये अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात गेले होते.

हिना खानला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी झाली. किमोथेरपीदरम्यान हिनाच्या प्रकृतीवर बराच परिणाम झाला होता. तिने तिचे केससुद्धा कापले होते. आता हळूहळू या सर्व गोष्टींमधून ती सावरत असून त्यात रॉकीची तिला खंबीर साथ मिळत आहे. कॅन्सरशी लढा देण्याच्या या संपूर्ण प्रवासात रॉकी तिच्या बाजूने कायम उभा होता. हिना आणि रॉकी यांची भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी निर्माता होता.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा