हृतिक रोशनची पहिली पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये कसं आहे नातं? स्क्रिनशॉर्ट पाहून म्हणाल…

Hrithik Roshan Girlfriend | हृतिक रोशन याची पहिली पत्नी आणि अभिनेत्याची गर्लफ्रेंड यांचा 'तो' फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, कसं आहे दोघींमध्ये नातं? सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

हृतिक रोशनची पहिली पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये कसं आहे नातं? स्क्रिनशॉर्ट पाहून म्हणाल...
| Updated on: Apr 01, 2024 | 3:13 PM

अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री आणि गायक सबा आझाद हिला डेट करत आहे. तर अभिनेत्याची पहिली पत्नी सुझान खान हिच्या आयुष्यात देखील अभिनेता अर्सनाल गोनी याची एन्ट्री झाली आहे. घटस्फोटानंतर हृतिक – सुझान यांचे मार्ग वेगळे झाले आहे. पण आजही दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. नुकताच, दोघांनी मोठा मुलगा ऋहान रोशनचा 18 वा वाढदिवस गोव्यात साजरा केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋहान याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सबा देखील उपस्थित होती.

सुझान हिने सबा हिच्यासोबत फोटो देखील पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत… असं चित्र दिसत आहे. सबा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत सुझान हिने खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. तर सबा हिने सुझान हिने केलेली पोस्ट रीपोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र दोघींच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सबा आणि सुझान यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे. तर दोघी एकमेकींना प्रेमाने ‘साबू’ आणि ‘सूझ’ म्हणतात. सुझान, अर्सनाल, सबा, हृतिक या चौघांना एकत्र अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

हृतिक रोशन – सुझान खान

हृतिक रोशन – सुझान खान यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांनी ऋहान आणि ऋदान या दोन मुलांचं जगात स्वागत केलं. पण हृतिक रोशन – सुझान खान यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये हृतिक रोशन – सुझान खान यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा हिची एन्ट्री झाली. सुरुवातील फक्त दोघे एकमेकांना  डेट करत आहेत अशी चर्चा होती. पण कालांतराने दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

सोशल मीडियावर देखील हृतिक कायम सबा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतो. चाहते दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. एवढंच नाहीतर, हृतिक – सबा लग्न कधी करणार? असा प्रश्न देखील चाहते विचारत असतात.