Lata Mangeshkar : सलग 8 तास उभं राहून गायलं, आई-मुलाच्या नात्यावरचं मनाचा ठाव घेणारं गाण, लतादीदींचा आवाज ऐकून डोळे येतात भरून!

लता मंगेशकर यांना उगाच गाणसम्राज्ञी म्हटलं जात नाही. त्या त्यांच्या गाण्याप्रती किती प्रामाणिक होत्या याचा एक मोठा किस्सा समोर आला आहे. हा किस्सा जुनाच आहे, जो एका सिनेमातील गाण्याबद्दल असून दिग्शदर्शकांनी सांगितला होता.

Lata Mangeshkar : सलग 8 तास उभं राहून गायलं, आई-मुलाच्या नात्यावरचं मनाचा ठाव घेणारं गाण, लतादीदींचा आवाज ऐकून डोळे येतात भरून!
how lata mangeshkar recorded luka chuppi song for rang de basanti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 8:42 PM

एखादं गाणं लोकप्रिय होण्यामागे गायकाचा आवाज, संगीत आणि शब्द यांचा मोठा वाटा असतो. पण हे सगळं सुंदर जमून येण्यासाठी कलाकार किती मेहनत घेतात, याची फारशी कल्पना आपल्याला नसते. लता मंगेशकर यांच्या बाबतीतही असाच एक किस्सा आहे. ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील ‘लुका छुपी’ हे गाणं आठवतंय ना? या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लता दीदींनी चक्क चार दिवस आधीपासून सराव सुरू केला होता. एवढंच नाही, तर प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या दिवशी त्या सलग 8 तास माईकसमोर उभ्या होत्या.

रेकॉर्डिंगच्या आधीच चेन्नईत पोहोचल्या

‘रंग दे बसंती’चे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या गाण्याचा खास किस्सा सांगितला होता. लता मंगेशकर यांना या गाण्यासाठी विचारण्यात आलं होतं. अनेकदा संपर्क केल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी गाणं गाण्यास होकार दिला.

Loading...

गाण्याचं रेकॉर्डिंग 15 नोव्हेंबरला ठरलं होतं. मात्र, लता दीदी 9 किंवा 10 नोव्हेंबरलाच चेन्नईला पोहोचल्या. ए. आर. रहमान यांचा स्टुडिओ चेन्नईत होता. त्या दुसऱ्या कामासाठी आल्या असतील, असं सुरुवातीला दिग्दर्शकांना वाटलं. पण लता दीदी थेट गाण्याचा सराव करण्यासाठी स्टुडिओत पोहोचल्या होत्या.

खुर्ची ठेवली, पाण्याची बाटलीही ठेवली

राकेश मेहरा यांनी सांगितल्यानुसार, लता मंगेशकर सलग चार दिवस स्टुडिओत येऊन गाण्याचा सराव करत होत्या. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या दिवशीही त्यांनी जवळपास 8 तास मेहनत घेतली. त्यांच्या सोयीसाठी स्टुडिओमध्ये खुर्ची, पाण्याची बाटली आणि फुलं ठेवण्यात आली होती. मात्र, लता दीदी बराच वेळ माईकसमोर उभ्याच राहिल्या. ए. आर. रहमान यांच्यासोबत गाण्यातील प्रत्येक भागावर त्या मेहनत घेत होत्या.

आई-मुलाच्या नात्याचं गाणं आजही लोकप्रिय

2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील ‘लुका छुपी’ हे गाणं आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक प्रसंग दाखवतं. चित्रपटात माधवन यांनी अजयची भूमिका साकारली होती. त्याच्या मृत्यूनंतर आई आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. या प्रसंगात लता मंगेशकर आणि ए. आर. रहमान यांच्या आवाजातील हे गाणं ऐकायला मिळतं.

या गाण्याचे शब्द प्रसून जोशी यांनी लिहिले असून संगीत ए. आर. रहमान यांचं आहे. आजही हे गाणं ऐकलं की अनेकांचे डोळे पाणावतात. विशेष म्हणजे, इतका मोठा अनुभव असतानाही लता मंगेशकर यांनी या गाण्यासाठी चार दिवस सराव केला होता. त्यांच्या याच मेहनतीमुळे या गाण्याला एक वेगळीच भावनिक ताकद मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us