
जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील मेघनाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली, हास्यजत्रामध्ये धमाल सूत्रसंचालन करत खळखळून हसणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सगळ्यांचीच लाडकी. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला फुलवंती चित्रपट असो की प्राजक्तराज या दागिन्यांचा ब्रँड असो, चर्चेत कसं रहायचं हे प्राजक्ताला चांगल माहीत आहेत. सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असणारी प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी सतत काही ना काही शेअर, पोस्ट करत असतेच. कधी चित्रपटाबद्दल , कधी ब्रँडबद्दल ती बोलत असते. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण तेवढीच एक यशस्वी उद्योजिकाही आहे.
या सगळ्या कामाच्या व्यापात असली तरी ती तिच्या फिटनेसकडेही तेवढंच लक्ष देतं. ग्लॅमरच्या दुनियेत असल्याने तशा तर सर्वच अभिनेत्री, अभिनेते स्वत:ची काळजी घेतातच , प्राजक्ताही त्यात मागे नाही. ती नेहमी स्वत:ला मेंटेन ठेवते. वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं न बोलणाऱ्या प्राजक्ताने यावेळीस मात्र चक्क तिच्या आयुष्याहद्दल अपडेट दिलं आहे. तिचं वजन किती हे चक्क प्राजक्तानेच एका पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना थेट
सांगितलं आहे.
काय आहे प्राजक्ताची पोस्ट ?
कधी नव्हे ते (कष्ट न घेता) छान #collerbones दिसायला लागलेत…
कधी नव्हे ते #jawline यायला लागलीए…
कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय…🤪
आणि आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस..,
आणि मला तर वजन ५० करायचय. (आत्ता 51 आहे.)
.
म्हंटलं #instafamily #महाराष्ट्राला विचारूया, तुम्हाला काय वाटतं.
.
प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते?
१ – वजन ५१ ok आहे.
२ – वजन ५० कर.
३ – वजन ५३ with #chubbycheeks .
#सांगापटापट.
#लालछडी
अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे. तिच्या या पोस्टवरून सध्या तिचं वजन 51 किलो असल्याचं स्पष्ट झालं आहे.मात्र यापुढे भविष्यात आपलं वजन 50 वर आणण्याचं तिचं टार्गेट आहे. तिच्या या पोस्टवक चाहत्यांनी नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काहींनी तर एकाहून एक भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस,असं तिच्या एका चाहत्याने लिहीलं आहे. तर 53 पाहिजे प्राजु मॅडम, खूप भारी वाटतात अशी मागणी दुसऱ्याने कमेंटमधून केली आहे. आता सध्याचं चांगलं आहे ना कम ना ज्यादा, medium च चांगलं असतं असंही एकाने लिहीलं. प्राजक्ता, तुझं हे वजन कितीही असलं तरी प्रेक्षकांच्या मनातलं वजन मात्र कायम वरचढ ठरेल अशी भन्नाट कमेंटही एका युजरने केली आहे.