
ग्रीक गॉड अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने मुंबईत दोन नवे फ्लॅट खरेदी केले आहेत. ऋतिकच्या नव्या फ्लॅटची किंमत ऐकूण अनेकांचे डोळे पांढरे होतील.

ऋतिकने खरेदी केलेले दोन्ही फ्लॅट तब्बल 38 हजार चौरस फुट इतके मोठे आहेत. जुहू-वर्सोवा लिंक रोडलगतच्या इमारतीत 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर हे फ्लॅट आहेत.

मुंबई मिररने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऋतिकचे दोन्ही फ्लॅट सी-फेसिंग अपार्टमेंट आहेत.

या दोन्ही फ्लॅट्सची किंमत तब्बल 97 कोटी रुपये इतकी आहे.

ऋतिक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या जुहू परिसरात राहतो. तो सध्या ज्या इमारतीत राहतो तिथे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा शेजारी आहे.