‘आता तर निकाह…’, हृतिक रोशनची पहिली पत्नी थाटणार दुसरा संसार?

Hrithik Roshan Ex Wife Sussanne Khan | हृतिक रोशन याच्यासोबत घटस्फोट आणि वयाच्या 48 व्या वर्षी सुझान करणार दुसरं लग्न, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

आता तर निकाह..., हृतिक रोशनची पहिली पत्नी थाटणार दुसरा संसार?
| Updated on: Jun 19, 2024 | 8:39 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. लग्नाला 19 वर्ष आणि दोन मुलांच्या जन्मानंतर हृतिक आणि सुझान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर हृतिक अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत आहे, तर अभिनेत्याची पहिली पत्नी सुझान अभिनेता आणि मॉडेल अर्सलान गोनी याला डेट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्सलान आणि सुझान एकत्र आहेत. एवढंच नाहीतर, दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

आता देखील सुझान आणि अर्सलान यांच्या लग्नाची चर्चा जोर धरत आहे. लग्नाची चर्चा रंगत असताना सुझान हिने बॉयफ्रेंड अर्सलान याच्यासोबत ईद देखील साजरी केली. सुझान हिने इन्स्टाग्रामवर अनेक फोटोंचा व्हिडीओ तयार करत पोस्ट केला आहे. ज्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

सुझान खान हिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेता अली गोनी, जास्मिन भसीन आणि गोनी कुटुंबातील इतर सदस्य देखील दिसत आहेत. सुझान खान हिने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुझान हिने पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेटकरी देखील सुझान हिच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘आता तरी निकाह करा…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दोघांची जोडी किती चांगली वाटते.’ तर अनेकांनी दोघांना आणि कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र सुझान खान हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सुझान आणि हृतिक यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. हृतिक रोशन – सुझान खान यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांनी ऋहान आणि ऋदान या दोन मुलांचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2013 मध्ये हृतिक रोशन – सुझान खान यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा हिची एन्ट्री झाली. सुरुवातील फक्त दोघे एकमेकांना  डेट करत आहेत अशी चर्चा होती. पण कालांतराने दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाहीतर, दोघे एकमेकांसोबत फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.