
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन याची गर्लफ्रेड आणि अभिनेत्री सबा आजाद हिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर सबा हिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सबा ‘सायक्लोस्पोरा कॅयटेनेसिस’ नावाच्या एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे… सबा हिला गंभीर परजीवी संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृतिक रोशन कठीण काळात तिच्या पाठीशी उभा राहून तिला धीर देत आहे. सबाची प्रकृती आता स्थिर आहे, परंतु ती पूर्णपणे बरी व्हावी यासाठी डॉक्टर तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
धोकादायक इंफेक्शन झाल्यामुळे सबा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी सबा हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत केला आहे. ज्यामध्ये ती रुग्नालयाच्या बेडवर दिसत आहे. सध्या सबाचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
फोटो पोस्ट करत सबा म्हणाली, ‘सर्वात वाईट 14 दिवस…’, सबाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट करत तिच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. सबा म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट चौदा दिवस. सबा ‘सायक्लोस्पोरा कॅयटेनेसिस’ तू खूप भयानक आहेस. माझ्यासारखी व्यक्ती जी कायम घरातील अन्न खाते आणि पाण्याची बाटली देखील सोबत ठेवते… तिला असा संसर्ग कसा झाला… ते सुद्ध व्यस्त वेळापत्रक असताना… या 2 आठवड्यात माझं 4 किलो वजन कमी झालं आहे… आता तर माझी परिस्थिती अशी झाली आहे, मी चालू देखील शकत नाही…’
पुढे सबा म्हणाली, ‘एका दिवसांत दोन वेळा ट्रेनिंग करत होता. वजन देखील उचलत होती… आज माझ्यात वजन तर सोडा एक टुथपिक उचलण्याची देखील शक्ती नाही… म्हणून तुमच्या आरोग्यासाठी, सॅलडची पाने आणि भाज्या अशाप्रकारे धुवा जणू काही तुमचा जीव त्यावर अवलंबून आहे, कारण कधीकधी ते खरंच तसं असतं. आम्ही आता बेकिंग सोडा आणि ‘व्हेजी वॉश’ वापरत आहोत.’ असं देखील सबा म्हणाली.
पोस्टच्या शेवटी सबा हिने हृतिक रोशन याचे आभार मानले… सबा म्हणाली, ‘मी खूप चिडलेली असतानाही हृतिकने मला प्रेरित ठेवलं. तो अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीतही विनोद करून मला आनंदी ठेवत आहे…. सध्या सबा हिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हृतिक आणि सबा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा हिची एन्ट्री झाली. सबा आणि हृतिक यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली आहे. एवढंच नाहीतर, हृतिक याच्या कुटुंबियांसोबत देखील सबा हिचे चांगले संबंध आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.