हृतिक रोशनसोबत सुशांत सिंह राजपूत? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

या व्हायरल फोटोमध्ये हृतिक ज्या व्यक्तीसोबत उभा आहे, त्याला पाहून चाहते चक्रावले आहेत. ही व्यक्ती सुशांतची आठवण करून देतेय, असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलंय. त्याचप्रमाणे सुशांतसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण, अशीही उत्सुकता अनेकांना आहे.

हृतिक रोशनसोबत सुशांत सिंह राजपूत? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!
हृतिक रोशन
| Updated on: Feb 24, 2023 | 10:08 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या निधनाच्या धक्क्यातून आजही चाहते सावरले नाहीत. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि त्याच्यासाठी खास संदेश चाहत्यांकडून व्हायरल केले जातात. अशातच चाहत्यांना अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या एका फोटोमध्ये हुबेहूब सुशांतसारखा दिसणारा व्यक्त दिसला. त्यामुळे हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये हृतिक ज्या व्यक्तीसोबत उभा आहे, त्याला पाहून चाहते चक्रावले आहेत. ही व्यक्ती सुशांतची आठवण करून देतेय, असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलंय. त्याचप्रमाणे सुशांतसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण, अशीही उत्सुकता अनेकांना आहे.

हृचिकच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर क्षणभरासाठी लोकांना असं वाटलं की जणू सुशांतच परत आला आहे. मात्र हे शक्य नाही. हृतिकच्या फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती अभिनेता नाही तर स्टंटमॅन मंसूर अली खान आहे. या फोटोला एका पापाराझीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तर मंसूरने हृतिकच्या वाढदिवशी हा फोटो शेअर केला होता.

फोटो पाहून चाहते थक्क

व्हायरल फोटोला पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर काही नेटकरी कमेंट बॉक्समध्ये सुशांतसाठी भावूक मेसेज लिहित आहेत. मंसूरचं दिसणं, त्याची चेहरेपट्टी, उंची, शरीरयष्टी हुबेहूब सुशांतसारखी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. ‘हा फक्त मलाच सुशांत सिंह राजपूतसारखा दिसतोय की आणखी कोणालाही असाच भास झाला,’ असं एकाने लिहिलं. तर ‘हा तर सुशांत आहे भावा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सुशांत आजही प्रत्येकाच्या मनात आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. छोट्या पडद्यावरून बॉलिवूडपर्यंत प्रवास केलेल्या सुशांतचा चाहतावर्ग मोठा आहे.