AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूच्या अडीच वर्षानंतर कुटुंबातील ‘या’ खास सदस्याचं निधन

सुशांतची बहीण प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही दु:खद बातमी दिली. त्यावर सुशांतच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूच्या अडीच वर्षानंतर कुटुंबातील 'या' खास सदस्याचं निधन
सुशांत सिंह राजपूत
| Updated on: Jan 17, 2023 | 11:27 AM
Share

मुंबई: जवळपास अडीच वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने आपले प्राण गमावले आहेत. हा सदस्य सुशांतचाही लाडका होता. सुशांतचा पाळीत कुत्रा फज याचं निधन झालं आहे. सुशांतची बहीण प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही दु:खद बातमी दिली. त्यावर सुशांतच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सुशांतचे फजसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. सुशांतच्या निधनानंतर फजसुद्धा एकाकी राहू लागला होता.

सुशांतची बहीण प्रियांका सिंगने ट्विटरवर फजचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिलं, ‘फज, अखेर तू सुद्धा तुझ्या मित्राकडे स्वर्गात निघून गेलास, लवकरच भेटीन. तोपर्यंत माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.’ फजचा 21 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. मात्र त्याआधीच त्याने या जगाचा निरोप घेतला.

प्रियांकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केलं आहे. ‘माझं मन खूप दुखावलंय. स्वर्गात त्या दोघांची पुन्हा भेट होईल अशी आशा आहे. फज आणि सुशांत एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घ्यायचे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘हे वाचून मला खूप वाईट वाटतंय. यात समाधानाची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फज आता त्याच्या मित्राकडे गेला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

फजसोबत सुशांतची खूप चांगली मैत्री होती. तो फजला त्याच्यासोबत ट्रिपलाही घेऊन जायचा. सुशांतच्या निधनानंतर फज एकाकी राहू लागला आणि काही दिवस त्याने खाणं-पिणंही सोडलं होतं. सुशांतचे कुटुंबीय त्याला आपल्यासोबत घेऊन गेले होते. सुशांतचे आणखी तीन पाळीव कुत्रे होते. अमर, अकबर आणि अँथनी अशी त्यांची नावं होती. या तिन्ही कुत्र्यांना नंतर दुसऱ्यांनी दत्तक घेतलं. सुशांतने या पाळीव कुत्र्यांसाठी फार्महाऊस घेण्याचाही प्लॅन केला होता.

2018 मध्ये सुशांतने फजसाठी हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. फजचा फोटो शेअर करत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं होतं, ‘जर मी तुझ्या लक्षात असेल तर दुसरी कोणतीही व्यक्ती मला विसरल्याने फरक पडणार नाही. माझं प्रेम.. माझा फज.’

14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरात सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.