
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. आज सबा आझाद हिचा 38 वा वाढदिवस आहे. ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासाठी एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.
विशेष म्हणजे ऋतिक रोशन याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याची एक्स पत्नी सुझान खान हिने देखील कमेंट केलीये. ऋतिक रोशन याने पोस्टमध्ये लिहिले की, सर्वजण अशी एक जागा नेहमीच शोधत असतात, जिथे आपल्याला आराम मिळेल. असे एक रिलेशन जिथे आपल्याला सुरक्षित वाटते, अशा जोडीदाराला आपण आयुष्यभर मोकळेपणाने सांगू शकतो.
आम्ही रोमांचसाठी तयार आहोत. पुढे ऋतिक रोशन म्हणाला की, तू माझे घर आहेस, जिथे रोमांच सुरू होतो. जीवन जगताना एक जादुई अनुभूती येते आणि हे सर्व मी तुझ्याकडून शिकलो आहे. तू जशी आहेस तशी राहण्यासाठी धन्यवाद. चल एका रोमांचवर जाऊया. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माय लव्ह…
या पोस्टसोबतच ऋतिक रोशन याने एक अत्यंत खास असा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. ऋतिक रोशन याने शेअर केलेली ही पोस्ट लोकांना चांगलाच आवडताना दिसत आहे. लोक ऋतिक रोशन याने शेअर केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. ही पोस्ट व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना डेट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात धमाल करताना दिसले. ऋतिक रोशन याने विदेशातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एका कॅफेमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसत होते.