‘मला एका भांड्यात लघवी करायला सांगितली…’, लिन लैशरामसोबतच्या लग्नाच्या विधींबद्दल रणदीप हुडाचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या लग्नातील विधींबद्दल सांगिंतलं ज्यांच्याबद्दल जाणून कोणालाही धक्का बसेल. तसेच तो हे देखील म्हणाला की त्याच्या बायकोच्या बाजूकडे फारच वेगळी संस्कृती पाळली जाते. ज्याबद्दल आपण कधीहा ऐकले नसेल.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने अलीकडेच ‘जाट’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केलं आहे.यावेळी एका मुलाखतीदरम्यान णदीप हुड्डाने त्याच्या लग्नाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. रणदीप हुड्डाने नोव्हेंबर 2023 मध्ये मेईतेई रितीरिवाजांनुसार लिन लैशरामशी लग्न केलं. अलीकडेच रणदीपने त्याच्या लग्नादरम्यानच्या विधींबद्दल अंस काही धक्कादायक सांगिलं. लग्नाच्या विधींमधील एक रीत म्हणून त्याला एका भांड्यात लघवी करण्यास सांगितले गेले होते.
‘तुम्हाला तेव्हा खूप आदरणीय दिसावं लागतं’
हा प्रसंग सांगताना रणदीप हुडा म्हणाला, ‘लग्नाच्या विधींमध्ये माझ्यासोबत एक मदतनीस होता, जो एका ट्यूटरसारखा होता. म्हणून जेव्हा नवरा मुलगा त्याचे सामान डोक्यावर ठेवतो तेव्हा तुम्ही डोके खाली टेकवू शकत नाही. तुम्ही समारंभाला जाता आणि ते तुम्हाला एक वाटी आणि छत्री देतात. मग ते तुम्हाला एका होल्डिंग एरियामध्ये ठेवतात, जिथे सर्वांना येऊन तुम्हाला भेटावे लागते आणि तुम्हाला तेव्हा खूप आदरणीय दिसावं लागतं.’
मंडपात फिरण्यास मनाई होती
पुढे तो म्हमाला की, ‘एकदा तुम्ही मंडपात आलात, जिथे सर्व मिदांग वादक उष्णतेत मीठ शिंपडतात आणि सर्व पंडित मंत्र म्हणतात, तेव्हा तुम्हाला हालचाल करायची नसते. ते तुम्हाला सर्व बाजूंनी ब्लँकेटमध्ये गुंडाळतात. म्हणून जर मी आरामशीर स्थितीत बसलो तर मदतनीस मला नीट सांगतो आणि म्हणतो की तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसायचं आहे. तुम्ही आज देव आहात. दोन तास मला माझी पाठ सरळ करून डोके वर करून बसावे लागलं.’
View this post on Instagram
लघवी करण्यासाठी एक वाटी देण्यात आली
पुढे तो प्रसंग सांगत रणदीप म्हणाला की, ‘मग मी विचारले की ती वाटी कशासाठी आहे, तेव्हा तो म्हणाला की जर तुम्हाला लघवी करायची असेल तर तुम्ही फक्त छत्री उघडा आणि त्यात लघवी करा, तुम्ही येथून कुठेही हलू शकत नाही कारण तुम्ही देव आहात. आणि जेव्हा ती म्हणजे नवरी लिन आली तेव्हा तिच्याकडेही एक ट्यूटर होती. तिच्या ट्यूटरने तिला खूप फटकारले. ती हसत होती आणि तुम्ही हसू शकत नाही, म्हणून मदतनीस येऊन तिला हसणे थांबवण्यास सांगायची.’
रणदीप मणिपुरी संस्कृतीला ‘ऑर्गनाइज्ड’ म्हणतो
हरियाणवी संस्कृती आणि मणिपुरी संस्कृती खूप वेगळी आहे. आमची संस्कृती खूपच असभ्य आणि अश्लील आहे आणि त्यांची संस्कृती खूपच आहे. तिने खूप सोने घातले होते आणि मला असे वाटले की किमान येथे एक चित्रपट बनवला गेला आहे. तिथे सिविल वॉर सुरु होते आणि जसे सप्तपधी घेऊन झाले अन् शेकडो AK-47 हवेत उडू लागले.
