
बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील एक म्हणजे सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान. त्याने देखील ‘नादियां’ चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली पण त्याची जादू फार काही चालली नाही. पण इब्राहिमने एका मुलाखतीत त्याच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगितली की त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लहानपणापासूनच एक गंभीर आजार आहे. त्याच्याशी तो आजही लढतोय.
इब्राहिमला बोलण्यासाठी आणि ऐकण्याबद्दल समस्या आहे.त्याने एका मुलाखतीत त्याच्या या समस्येचा उल्लेख केला. जन्मानंतर त्याला लगेचच कावीळ झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे इब्राहिमने सांगितले. तो अजूनही त्यावर उपचार घेत असल्याचं त्याने सांगितले.
आवाज अजूनही दुरुस्त झालेला नाही
इब्राहिम अली खानला ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम झाला हे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला की, ‘माझा जन्म होताच मला कावीळ झाली आणि त्याचा परिणाम थेट माझ्या मेंदूपर्यंत पोहोचला होता. माझा आवाज आणि ऐकण्याची क्षमता जवळजवळ संपली होती. मी लहानपणापासूनच माझ्या भाषणावर म्हणजे बोलण्यावक काम करत आहे. प्रशिक्षक आणि थेरपिस्टची मदत घेत आहे. मी अजूनही त्यावर कठोर परिश्रम करत आहे. त्यासाठी उपचार घेत आहे.
इंग्लंडमध्ये खूप काही शिकलो.
इब्राहिमला बोलायला त्रास होत होता पण त्याच्या पालकांनी त्याला इंग्लंडमधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. इब्राहिमचा असा विश्वास आहे की यामुळे त्याचे व्यक्तिमत्व घडलं. इब्राहिम म्हणाला, ‘भारतीय असल्याने तिथे फिट बसणं थोडं कठीण होतं पण ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम चार वर्षे होती.मी खेळ खेळलो, नवीन मित्र बनवले आणि खूप काही शिकलो. त्यावेळी, माझी बोलण्याची समस्या खूपच जास्त होती आणि मी अशा ठिकाणी पोहोचलो जिथे मला जगायचेच होते तेही स्वत:च्या गोष्टी घेऊन”
शाळेत कडक वातावरण होते
इब्राहिम पुढे म्हणाला की “मी हे एका श्रीमंत बिघडलेल्या मुलासारखे बोलत नाहीये पण 14 वर्षांचे असताना बोर्डिंग स्कूल सोपे नव्हतो. ते खूप कडक होते. तरीही त्याने माझ्या चारित्र्याला एक आकार दिला आणि जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.” अशा पद्धतीने आजही इब्राहिमला बोलण्यात आणि ऐकण्यात त्रास होत आहे. पण त्यावर तो उपचार करून आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अभिनयातही नशीब आजमावत आहे.
इब्राहिम अभिनयामुळे झाला ट्रोल
इब्राहिम अली खानने खुशी कपूरसोबत ‘नादियां’ या चित्रपटातून पदार्पण केले. दोन्ही कलाकारांना त्यांच्या अभिनयाबद्दल बरीच टीका सहन करावी लागली. इब्राहिमची आजी शर्मिला टागोर यांनीही चित्रपट तितकासा चांगला नव्हता असे म्हटले होते. पण त्यांनी इब्राहिमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.