
बॉलिवूडचे सेलिब्रिटी किड्स असलेला इब्राहिम अली खान हा सध्या त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीमुळे चर्चेत असतो. इब्राहिम अली खान फक्त चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जसं की, इब्राहिम अली खानचे नाव हे पलक तिवारी यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा होताना दिसते. दोघांनाही अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. पण आता ते नेहमीपेक्षा जास्त एकत्र दिसतात.
इब्राहिम अन् पलक तिवारी रात्री मूव्ही डेटवर
पलक आता फक्त इब्राहिमसोबतच नाही तर त्याच्या कुटुंबासोबतही दिसू लागली आहे. गुरुवारी रात्री मूव्ही डेटवर आलेले पाहायला मिळालं. पण यावेळी इब्राहिम, पलकसह सारा अली खानही होती. हे तिघेही एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी तिघेही एकत्र दिसले.मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.
पापाराझींना पाहाताच इब्राहिम आणि पलक लाजले
मात्र पापाराझींना पाहाताच इब्राहिम आणि पलक थोडेसे लाजलेले दिसले. तसेच तो कॅमेऱ्याकडेही पाहत नव्हता. दरम्यान, सारा देखील हसत हसत निघून गेली आणि इब्राहिमला चिडवताना दिसली. पलकनेही कॅमेऱ्याकडे न पाहता ती थेट निघून गेली. दोघांनीही हुडी टीशर्ट घातला होता तर साराही अगदी कॅज्यूअल कपड्यांमध्ये दिसली. तिघेही पापारांझींकडे न पाहता तिघेही शांतपणे लिफ्टमध्ये गेले. बरं, हे तिघांनीही असा एकत्र वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही हे तिघे सुट्टीसाठी गोव्याला एकत्र गेले होते.
गोव्याला एकत्र सुट्टी घालवली
एका मुलाखतीत इब्राहिमने स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला होता. तेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो सिंगल आहे का? यावर इब्राहिमने आधी हो म्हटलं होतं आणि नंतर लगेच ‘नाही’ म्हटलं. त्याचं हे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं आणि तेव्हापासून पलक आणि इब्राहिमच्या नात्यांबद्दल फारच चर्चा होऊ लागली आहे. तसेच तिघांचा हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास
त्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास इब्राहिमने अलीकडेच ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पलकने सलमान खानच्या ‘ किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पदार्पण केले होते . त्यानंतर ती मौनी रॉय, संजय दत्त आणि सनी सिंग यांच्या अभिनयाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूतनी’ चित्रपटात दिसली.